'बार्टी' च्या वतिने संविधान दिन जागृती सप्ताहाची भोकरमध्ये सुरूवात

भोकर/नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) च्यावतिने समतादूत कु.राणीपद्मावती बंडेवार यांच्या मार्गदर्शनात भोकर तालुक्यामध्ये संविधान दिन जागृती सप्ताहास सुरूवात करण्यांत आली असून या निमित्ताने विविध उपक्रम घेण्यांत येत आहेत.

संविधान दिनानिमित्त 'बार्टी' च्या वतिने विविध
उपक्रम राबविण्यांत येत असून दि.21 ते 27 नोव्हेंबर या कालावधित संविधान दिन जागृती सप्ताह आयोजित करण्यांत आला आहे. संविधानातील मुल्यांविषयी प्रबोधन व संविधान दिन जागृती या माध्यमांतून करण्यांत येत असून भोकर येथून या सप्ताहाची सुरूवात करण्यांत आली आहे.

मंजूळाबाई किन्हाळकर मुलींचे विद्यालय, भोकर येथे संविधान प्रस्ताविका सामूहिक वाचन व प्रस्ताविका वाटप करून शहरातून शालेय विद्यार्थ्यांची संविधान जागृती फेरी काढण्यांत आली. याप्रसंगी समतादूत कु.राणीपद्मावती बंडेवार यांच्यासह मुख्याध्यापिका सौ.सुरेखा नरसिंगराव पाटील, एस.बी. अक्कलवाड, पी.बी.वढई, डि.ए.मांजरकर, व्हि.जी.कुंबरे, सौ.एम.जी.बोडखे, आर.एम.पठाण, एस.टी.मोरे, एस.एन.मांजरेकर, एफ.ए.शेख, सि.एन.पाटील, ए.बी.शिंदे, व्ही.व्ही.पद्मवार, यु.एस.शिंदे, एस.बी.शिंदे, सौ.एस.व्ही. कुलकर्णी, एस.जी.हंबर्डे आदी शिक्षकवृंदांची उपस्थिती होती. भोकर तालुक्यातील सर्वच गांवात संविधान दिन जनजागृती सप्ताहा निमित्त संविधान जागृती, प्रबोधनपर विविध उपक्रम, संविधान चर्चासञ, संविधान प्रस्ताविका सामूहिक वाचन व प्रस्ताविका वाटप,शालेय विद्यार्थ्यांची निबंध व वक्तृत्व स्पर्धा आदी स्वरूपांची सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यांत येत असल्याचे समतादूत कु. राणीपद्मावती बंडेवार यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी