नवीन नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) तुप्पा येथे ,श्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठाव ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सोहल्याची सांगता २३ नोव्हेंबर हभप किशन महाराज बरबडेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने झाली या वेळी हजारो भाविकांची उपस्तिती होती.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्या
निमित्त दि १६ ते २३ नोव्हेंबर पर्यंत मौजे तुप्पा ता जी नांदेड येथे संपन्न होत असून श्री राम कथाकार ह भ प समाधान महाराज शर्मा केजकार यांच्या सुमधुर वाणीतून रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. तर २३ नोव्हेंबर रोजी मूर्ती स्थापना, कलशारोहन सोहळा श्री आनंदबनं गुरु गंभीरबन महंत मठ संस्थान तुप्पा व दिगंबर शिवाचार्य वेदान्तचार्य थोरला मठ वसमत यांच्याहस्ते मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली २२ नोव्हेंबर रोजी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता सकाळी १० वाजता ह भ प समाधान महाराज केजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात अली २३ नोव्हेंबर रोजी कलशा रोहणासह गणेश, विठ्ठल - रुक्मिणी, महादेव, दत्तात्रय, साईबाबा, तुकाराम, राम दरबार, खंडोबा, नामदेव महाराज, संत सेना, मारतळेकर महाराज यांच्या मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन दत्त संस्थान तुप्याचे आनंदबन महाराज यांच्या हस्ते करण्यात आले तर या प्रसंगी होम हवन व धार्मिक विधीचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा सांगता प्रसंगी जीप. अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, गोविंदराव नागेलीकर, यांच्यासह मान्यवर पदाधिकाऱयांची उपस्तिती होती. तुप्पा गावकरी व ग्राम पंचायतचे सरपंच साधना देवराव टिपरसें, उपसरपंच पार्वती कदम, ग्रामपंचात सदस्य, ग्रामसेवक सावंत, तंटामुक्त अध्यक्ष गंगाधर कदम, पस सदय गंगाधर नरवाडे, मा जी प स सुनिक पवार ,माजी सरपंच शिवकांत कदम माजी उपसरपंच भगवान कदम यांच्यासह ग्राप. कर्मचारी राजू कदम जेष्ठ नागरिक युवक यांनी प्रयत्न केले.