शेतकऱ्यांसाठी कृषि संदेश

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) नांदेड कृषि उपविभागातील नांदेड, मुदखेड, अर्धापूर, लोहा, कंधार या 5 तालुक्यामध्ये तूर, कापूस, हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पातंर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पिक किडीच्या संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे. 

कापशीवरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फेनवलेरट 20 इसी 8 मिली किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यु पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तुर शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेंझोएट 5 एस जी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाणी, एनएसई (निंबोळीतेल) 5 टक्के फवारणी करावी. हरभरा पिकांवरील मर रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी 1 टक्का डब्ल्यु पी  9 ग्रॅम प्रति किलो बियाणे बिजप्रक्रिया करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.  

धर्माबाद तालुक्यातील बीएलओ, तलाठ्यांची शुक्रवारी बैठक  

मतदार नाव नोंदणी विशेष मोहिमेबाबत धर्माबाद तालुक्यातील संबंधीत बीएलओ व तलठ्यांची शुक्रवार 24 नोव्हेंबर रोजी  दुपारी 2 वा. तहसील कार्यालय धर्माबाद येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. मतदार नोंदणीची माहिती घेण्यासाठी आवश्य क असणारे नमुने 1 ते 8, बीएलओ  नोंदवही, फॉर्म नंबर 6, 7 व 8 प्राप्त अर्जाबाबत आढावा घेण्यात येणार आहे. धर्माबाद तालुक्यातील संबंधीत बीएलओ, तलाठ्यांनी बुथ निहाय विशेष मोहिमेच्या माहितीसह उपस्थित रहावे, असे तहसिलदार धर्माबाद यांनी कळविले आहे. 



Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी