मुख्यमंत्र्यांची उपस्थिती अन् प्रतापराव पाटलांना पाठबळ
लोहा (हरिहर धुतमल) लोहा-कंधार मतदार संघात खालच्या स्तराला जाऊन राजकारण. भाषण होत असतानाच मराठवा्याच्या राजधानीत चिखलीकर परिवारांच्या विवाह सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्रीमंडळातील त्यांचे सहकारी, राज्याचे माजीउपमुख्यमंत्री अजितदादा पवार भाजप राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आणि दिग्गजांची उपस्थिती. प्रताप पाटील यांच्या राज्यपातळीवरील मित्रत्वाचा धागा ‘दृढ’ असल्याचे
संदेश दिला. जिल्ह्याच्या राजकारणात खा. अशोक चव्हाण यांच्यानंतर प्रताप पाटील या नेतृत्वाला पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. आपल्या आमदारांचे राज्यपातळीवर वजन आहे. मुख्यमंत्र्यांचे आ चिखलीकर याना पाठबळ आहे अशी मतदार संघात चर्चासुरू झाली नेत्याची विवाह सोहळ्याला होती. एक अविस्मरणीय सोहळ्या बरोबरच राजकीय बळ देणारा सोहळा ठरला
नांदेड मनपा निवडणुकीत भाजपाचा झालेला दारूण पराभवा नंतर लोहा-कंधार तालुक्यात आ. चिखलीकरांच्या विरोधकांनी उचलखाली परंतु दोन वेगवेगळ्या आंदोलनाला फारसा काही प्रतिसाद मिळाला नाही. मोर्चात वापरलेली शिवराळ भाषा ‘दणका’ देण्याऐवजी 'भावी' जुळवाजुळवीचा ‘मनका’मोडणारी ठरणार असे चित्र तयार होत आहे.मतदारसंघातील व जिल्ह्यातील मोठा समुदाय उपस्थिती होता. औरंगाबाद मध्ये आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या भाचीच्या विवाह सोहळ्यासाठी भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची झालेली गर्दी मराठवाड्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीपुन्हा एकदा प्रतापरावांवर विश्वास असल्याचे दाखविले. केवळ त्यांच्याच निमंत्रणावरून ते विवाह सोहळ्यासाठी हजर राहिले. तिकडे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची उपस्थिती सुखकारक ठरली. भाजपाच्या मराठवाड्यातील प्रभावी नेत्या पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कामगारमंत्री संभाजीराव निलंगेकर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश बापट, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, माजी उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री विनायक पाटील, माजी मंत्री अब्दुलसतार, महापौर नंदकुमार घोडेले यासह आमदार खासदार प्रमुखांची उपस्थिती होती.
आ. चिखलीकर व आ. भाऊसाहेब चिकटगांवकर यांचे नातेसंबंध झाले. मराठवाड्याच्या राजधानीत एक अविस्मरणीय देखणा विवाह सोहळा पार पडला. त्योच काटेकोर नियोजन आणि लोकांची उपस्थिती पाहता प्रतापरावांनी जिल्ह्याबाहेर मराठवाड्यात आणले मित्र परिवार चाहता वर्ग तयार केल्याचे पहायला मिळाले. प्रतापराव पाटील यांच्यावर मुख्यमंत्र्यांचा विचास आहे. त्यामुळेच वेळातला वेळ काढून खास लग्नासाठी मुख्यमंत्री आले. येत्याकाळात या मतदार संघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भरभरून देतील असा विश्वास व्यक्त होतोय. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्यानंतर राज्यपातळीवरील ‘बड्यानेत्यांचे’ मित्रत्व ठेवणारा दुसरा ‘नेता’ या जिल्ह्यात सद्यातरी नाही अशा चर्चा आतासुरू झाल्या आहेत.
ना. पंकजाताईचे ‘बळ’
मराठवाड्याच्या राजकारणात खा. अशोकराव चव्हाण, प्रदेशाध्यक्ष खा दानवे, कामगारमंत्री संभाजी पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे,यांचा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात आपआपले निष्ठावंत ,निर्माण करण्यावर आणि प्रभावी नेतृत्वाला उभारी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न असतो. प्रतापराव पाटलासारखा संघटक व आक्रमक नेता सोबत असला तर निश्चितच उपयोग’ होईल यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी नांदेड जिल्ह्यावर हळूहळू लक्ष केंद्रीत करायला सुरू केली आहे. मनपा निवडणुकीत 'लाल दिवा द्या 'अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली होती. आ. चिखलीकरांच्या कौटूंबिक सोहळ्याला त्या आवर्जून उपस्थितीत होत्या. त्यामुळे त्यांचे पाठबळ प्रतापरावांच्याच पारड्यात असेल असे दिसते.
मुंडे – भाऊ बहिण एकत्रित पण दुरावा कायम
आ. चिखलीकर – आ. चिकटगांवकर यांच्या कौटूंबिक सोहळ्याला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे – विरोधीपक्ष नेते आ. धनंजय मुंडे दोघे ही आले होते. हे बहीण भाऊ एकाच रांगेत बसले होते होते. त्यांच्या काही संवाद होतो काय याकडे उपस्थित वऱ्हाडी मंडळीचे लक्ष होते पंकजाताईच्या पूर्वीच धनंजय मुंडे आले होते. पंकजाताईचे आगमन झाल्यानंतर त्यांनी धनंजय मुंडेकडे ना पाहिले ना स्मित हास्य केले. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची वधु-वरांना शुभेच्छा दिल्या.' मुंडे 'भाऊ बहिण एकत्रित आले पण त्यांच्यातील दुरावा कायम होता.