आ. बच्चू कडूची २६ ला हिमायतनगरला शेतकरी आसूड सभा

हिमायतनगर (नृसिंह न्यूज नेटवर्क) प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी, कष्टकरी, दिव्यांगाचे नेते, शौषीत पिडीत वंचिताचे आधार, निर्भीड, निष्प्रह, निस्वार्थ, महाराष्ट्राची बुलंद तोफ मा. आमदार बच्चू भाऊ कडू याची शेतकरी आसूड सभा दि.२६ नोव्हेंबर रोजी परमेश्वर मंगल कार्यालय मैदान हिमायतनगर येथे आयोजित करण्यात आली आहे.

"शेतकऱ्यांच्या लेका, लढायला शिका....!, जेथे अन्याय तेथे प्रहार या घोषणा वाक्याने तालुका दुमदुमत आसून राज्य शासनाच्या शेतकर्‍यांप्रती असलेल्या अत्यंत उदासीन धोरणा विरूद्ध प्रहार जनशक्ती पक्षांच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी बांधवासाठी शेतकरी आसूड सभेचे दि २६ नोव्हेंबर रोजी परमेश्वर मंगल कार्यालय मैदान हिमायतनगर येथे आयोजन केले आहे. यासाठी सभेचे ठिकाणी स्टेज व सभामंडपाची व ध्वनीक्षेपाची जोडणी कामे वेगाने सुरू आहेत या सभेसाठी अध्यक्ष मा. तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. प्रमोद कुदळे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून बल्लूभाऊ जवंजाळ (कार्यअध्यक्ष) मंगेश देशमुख (प्र.शे.संघटना अध्यक्ष) अतूल खुपसे (प.म.सं.प्रमुख ) उमाकांत तिडके (नांदेड उत्तर जि.प्रमुख) गजानन जाधव (शिव व्याख्याते) विठ्ठलराव देशमुख (जि.संघटक) शंकरराव पाटील सावळीकर (जि.सं.प्रमुख) बालाजी बलपेलवाड (उपजिल्हा प्रमुख) प्रितपालसिंह शाहु (शहर प्रमुख नांदेड) अनिल पाटील (युवा उपजिल्हा प्रमुख) याच्या सह तालुका प्रमुख गजानन ठाकरे, कार्यअध्यक्ष बाळू शिरफुले, संघटक दयानंद वानखेडे, शेतकरी आघाडी चे मारोतराव वानखेडे, युवा आघाडीचे गणेश कदम, तालुका उपप्रमुख प्रभू कल्याणकर, रामदास पवार, अॅटो युनियन दिपक बुटले, तालुका सरचिटणीस मारोती वारकड, शेतकरी ता उप प्रमुख संजय राठोड, शहर प्रमुख चंदू भालेराव,दिगंबर जाधव, दिपक सावंत, अमोल वारकड, संदीप बुटले, पुंडलिक दमकोंडवार, कैलास पाटील,(शाखा प्रमुख) सह बंडू शिंदे, दत्ता काळे, अतूल जाधव, दिगंबर काळे, देवराव डोरले, अरविंद हनवंते, गजानन बंगनवार, प्रकाश राठोड, माधव देवराये, शरद कलाणे विठ्ठल, गजभारे, ज्ञानेश्वर देवराये, बाळू पतंगे, रावसाहेब काकडे, दादाराव पतंगे हे सर्व कार्यकारिणी शेतकरी आसूड सभेसाठी मेहनत घेत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी