नांदेड (अनिल मादसवार) नांदेड - लिंबगाव - चुडावा - पूर्णा दरम्यान रेल्वे पटरीच्या दुरुस्ती (टेम्पिंग) च्या कामाकरिता दिनांक 28.11.2017 ते 06.12.2017 दरम्यान रोज 2.30 तास असा 07 दिवसांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात येत आहेत, तर काही उशिरा धावतील. यात दिनांक 30.11.2017 (गुरुवारी) आणि 04.12.2017 (सोमवारी) कोणताच ब्लॉक घेण्यात येणार नाही.
हे कार्य रेल्वे पटरीच्या दुरुस्ती (टेम्पिंग) करिता आहे. कारण रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेस रेल्वे प्रशासन प्राथमिकता देते. प्रवाश्यांनी हे लक्ष्यात घ्यावे हि विनंती. प्रवाश्यांना होणाऱ्या त्रासा बाबत रेल्वे प्रशासन दिलगीर आहे. सकाळी 11.50 मिनटे ते 14.20 वाजे पर्यंत हा लाईन ब्लॉक घेण्यात येत आहे – या ब्लॉकमुळे रेल्वे सेवेवर पुढील परिमाण होतील –
(a) गाडी संख्या 17620 (नांदेड ते औरंगाबाद) शुक्रवारी दिनांक 01.12.2017 रोजी रद्द करण्यात आली आहे.
(b ) गाडी संख्या 16734 (ओखा-रामेश्वरम एक्स्प्रेस) बुधवार दिनांक 29.11.2017 आणि 06.12.2017 रोजी अंकाई ते पूर्णास्थानकांदरम्यान 2 तास 40 मिनिटे उशिरा धावेल.
(c) गाडी संख्या 57561 ( काचीगुडा ते मनमाड पासेंजर ) नांदेड रेल्वे स्थानकावर थांबविण्यात येईल. आणि नांदेड येथूनच परत गाडीसंख्या 57562 बनून नांदेड ते काचीगुडा पासेंजर बनून धावेल. मात्र गुरुवारी दिनांक 30.11.2017 आणि सोमवारी 04.12.2017 रोजीहि गाडी नियमित पने धावेल.
(d) गाडी संख्या 57562 (मनमाड ते काचीगुडा पसेंजर) पूर्णा रेल्वे स्थानकावरच थांबेल आणि परत पूर्णा रेल्वे स्थानकावरून 57561पूर्णा ते मनमाड बनून धावेल. मात्र गुरुवारी दिनांक 30.11.2017 आणि सोमवारी 04.12.2017 रोजी हि गाडी नियमित पने धावेल.
(e) गाडी संख्या 17641/17639 इंटर सिटी एक्स्प्रेस 50 मिनिटे नांदेड येथे थांबेल. मात्र गुरुवारी दिनांक 30.11.2017 आणि सोमवारी 04.12.2017 रोजी हि गाडी नियमित पने धावेल
(f) गाडी संख्या 17640/17642 इंटर सिटी एक्स्प्रेस 60 मिनिटे पूर्णा येथे थांबेल. मात्र गुरुवारी दिनांक 30.11.2017 आणि सोमवारी 04.12.2017 रोजी हि गाडी नियमित पने धावेल.
(g) गाडी संख्या 57541 (नगरसोल-नांदेड पसेंजर ) पूर्णा स्थानका पर्यंतच धावेल आणि नांदेड येथून हि गाडी पुढील लिंक बनून गाडीसंख्या 57558 अशी धावेल. मात्र गुरुवारी दिनांक 30.11.2017 आणि सोमवारी 04.12.2017 रोजी हि गाडी नियमित पने धावेल.
(h) मालगाड्या गरजे नुसार विविध स्थानकावर थांबविल्या जातील. याची सर्व प्रवाश्यानी नोंद घेऊन रेल्वे प्रशासनास सहकार्य करंबे असे आवाहन नांदेड रेल्वे डिव्हिजनच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.