पाणी टंचाई आढावा बैठकीत कार्ला -पी ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सरपंचास सुनावणीची नोटीस जारी 

हिमायतनगर (अनिल मादसवार) काल झालेल्या पाणी पुरवठ्याच्या बैठकीत अनेक गावात झालेल्या अर्धवट व भ्रष्टाचाराच्या तक्रारी झाल्या. त्यात प्रकर्षाने कार्ला येथील १४ वा वित्त अयोग्य आणि पाणी पुरवठ्याच्या भ्रष्टाचारावरून चांगलीच जुंपल्याचा उपस्थितांना पाहावयास मिळाले. दरम्यान या भ्रष्टाचाराबाबत अगोदरच नोटीस बजावण्यात आल्याने संबंधितांना कार्यवाहीस सामोरे जावे लागणार आहे.

गेल्या वर्षभरापासून कार्ला गावातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. असे असतं संबंधित सरपंच व तत्कालीन ग्रामसेवकाने नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य न देता स्वहितार्थ कामे करून आपले उखळ पांढरे केले. तसेच शौचालय, घरकुल, फेरफार, नमुना न.८, घाकुलातून नाव कमी करणे, मास्तर भरून रक्कम काढणे यासह अन्य कामासाठी तत्कालीन ग्रामसेवक श्री तावडे यांच्या संगनमताने जनतेच्या आडाणीपणाचा फायदा घेत चार ते पाच आकडी रक्कम घेऊन लूट केली आहे. दरम्यान गावातील एका नागरिकास केवळ फेरफारसाठी १२ हजारांची रक्कम मागितली होती. त्यास कंटाळून पिंटू कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर ग्रामसेवकास लाचलुचपत विभागाने १० हजाराची लाच घेताना जेरबंद केले होते. तेंव्हापासून तत्कालीन ग्रामसेवक श्री तावडे हे निलंबित झालेले आहेत. मात्र त्यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचारी अजूनही चौकशी न करता पंचायत  समितीच्या अधीकारी कर्मचाऱ्याकडून अभय दिले जात आहे.

त्यामुळे अखेर काल दि.२१ रोजी झालेल्या पंचायत समिती कार्यालयातील पाणी टंचाई आराखडा बैठकीत  आ. नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीत कार्ला येथील नागरिक भिमराव लुम्दे यांनी पाणी पुरवठ्यासह १४ व वित्त आयोगात झालेल्या भ्रष्टाचाराची तक्रार मांडली. तसेच अगोदरच्या पाणी पुरवठ्याच्या मोटारी गायब झाल्या याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यामुळे पित्त खवळलेल्या सरपंच सौ.सत्वशीला गौतम घोडगे यांच्या पुत्राने हि गोष्ट मनाला लावून घेऊन आमदार महोदयांना गावात पाणी आहे असे सांगून चौदा वित आयोग निधीत खर्च झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल सारवा - सारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्कालीन ग्रामसेवक तावडे यांच्या संगनमताने सरपंच सदस्यांनी १४ वा वित्त आयोगाचा निधी उचलून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आली होती. यानंतर येथील सरपंच, ग्रामसेवकास १४ वा वित्त आयोगाचा निधीत झालेल्या अफरा- तफर प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली असून, याची चौकशी झाल्यानंतर खरे काय ते समोर येणार आहे. याअगोदरच पंचायत समितीच्या बैठकीत हा प्रकार प्रकर्षाने समोर आल्याने एकीकडून पत्रकार सोपान बोंपिलवार यांनी तर दुसरीकडून पत्रकार जांबुवंत मिराशे यांनी आपापल्या समर्थकास बळ देण्याची भूमिका निभावली. एकुणंच ऐन बैठकीत तक्रार केल्याचा प्रकार सरपंच पुत्र व ग्रामपंचायत सदस्यांना चांगलाच झोबंल्याचे सर्वांसमक्ष झालेल्या तू तू... मै मैं... वरून दिसून आले आहे.  

सरपंचास अनर्ह ठरविण्याची मागणी 
कार्ला ग्रामपंचायतीचा कारभार हा येथील सपरांचा पुत्र पाहत असून, तत्कालीन ग्रामसेवकाश मिलीभगत करून नियमानुसार ग्रामसभा, मासिक सभा न घेताच परस्पर अनेक ठराव घेऊन भ्र्रष्टाचार केला आहे. त्यामुळे सौ. सत्वशील गौतम घोडगे याना सरपंच पदावर राहण्यास अनर्ह ठरविण्याची मागणी कार्ला येथील तुकाराम गणपत कदम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. त्यावरून संबंधित सरपंच व ग्रामसेवकास जिल्हाधिकारी महोदयांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ७ व ३६ नुसार चौकशी व सुनावणी बाबत एक नोटीस बजावली असून, लेखी व कागदपत्रासह पुरावे सादर करण्याचं कळविलेले आहे. याची सुनावणी दि.२९ डिसेंबर रोजी होणार असून, यामुळे सरपंचाची झोप उडाली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी