मुखेड तालुक्यात अवैध लाकडाची वाहतूक करणा­या ट्रकसह 2 लाखाचा माल जप्त

मुखेडच्या वनपरिक्षेत्र अधिका­याची कार्यवाही
मुखेड (ज्ञानेश्वर डोईजड) तालुक्यातील जांब बु. येथील चौकात कंधारहुन जांब बु मार्गे लातुर येथे वेगवेगळया प्रजातींच्या वृक्षांचे लाकुड ट्रकमध्ये घेऊन जात असतानाची मुखेड वनपरिमंडळास गोपनिय माहिती मिळताच त्यांनी दि. 22 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजून 40 मिनीटांनी सापळा रचून धाड टाकली यात 2 लाखाचा मुद्देमाल व ट्रक जप्त केली.

सविस्तर वृत्त असे की, आरोपी चालक बाबासाहेब
बापू भालेकर वय 44 वर्ष रा. राजुनगर बाभळगांव रोड, लातुर हा कंधार तालुक्यातून वेगवेगळया मोल्यवान वृक्ष त्यात बोर, बाभुळ, लिंब, हेळा अशा विविध प्रजातीचे लाकुड  ट्रक क्र. एमएच - 43 यु - 1206 या आयचर ट्रकमध्ये भरुन छुप्या मार्गाने रात्रीच्या वेळी घेऊन जात असल्याची माहिती मुखेड वनपरिमंडळ यांना मिळाली तेंव्हा वनपरिमंडळचे नुकतेच रुजु झालेले वनरिक्षेत्र अधिकारी पि.बि. रासणे, फिरते पथक नांदेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एन. रामपुरे, वनपरिमंडळ अधिकारी जे.जी. पांचाळ, लेखापाल महेबुब शेख व इतर काही कर्मचा­यांनी मिळून जांब बु. येथून रात्रीचा आधार घेऊन अवैधरित्या लाकुड घेऊन चाललेला ट्रकावर सापळा रचून धाड टाकून 2 लाखाचा मुद्देमालासह ट्रक जप्त करण्यात आले व त्याविरुध्द वनरिमंडळ अधिकारी मुखेड यांचे केस नं. 2 / 2017 दि. 22 नोव्हेंबर रोजी रात्री उशीरा वन गुन्हयानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून सदरील जप्त केलेला ट्रक व मुद्देमाल वनक्षेत्र कार्यालय मुखेड येथे जमा करण्यात आला आहे.


असे अवैध लाकुड वाहतूक करणारे ट्रक या परिसरात मोठया प्रमाणात फिरत असतात. पण अशा ट्रकवर वनविभागाने करडी नजर ठेवून किनवट येथून नव्यानेच मुखेड येथे वनरिक्षेत्र अधिकारी म्हणून आलेले पि.बि. रासणे यांनी गोपनीय मिळवून अशी धाडसी कार्यवाही केल्यामुळे अवैध वृक्षतोड व अवैध वृक्ष लाकुड वाहतूक करणा­यांचे धाबे दनानले आहेत. तर अशा कार्यवाहया नेहमी चालू राहतील का ? की नेहमीप्रमाणे यावेळीही याकडे केवळ चौकशीचा भाग समजून पुन्हा अभय देण्यात येणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी