नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) बिन भिंतीची उघडी शाळा... लाखो इथले गुरु... झाडे, वेली, पशू-पाखरे... यांच्या गोष्टी करु.... या गदिमांच्या कवितेप्रमाणे शालेय उपक्रमासोबतच वनभोजन या सहशालेय उपक्रमाचे शाळांकडून आयोजन केल्या जाते. चार भिंतीच्या आतील बंदिस्त अभ्यासक्रम एकदिवस टाळून निसर्गाच्या सानिध्यात झाडे, पशू, पक्षी, वेली यांच्याशी गुज गोष्टी करीत अनेक अनुभवांची समृद्धी हस्तगत करुन घेण्यासाठी निसर्ग शाळा हा उपक्रम घेण्यात येतो. जिल्हा परिषदेच्या खडकमांजरी प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी वनभोजन या कार्यक्रमातून निसर्ग शाळेचा मनमुराद आनंद घेतला.
मोकळ्या रानी आणि उघड्या आभाळी मुलांनी गप्पा, गोष्टी, शालेय कविता, गाणी, स्वरचित कविता, मिमीक्री, प्राण्यांचे हुबेहूब आवाज, नाट्य संवाद, विनोद, चुटकुले, मैदानी खेळात सहभाग घेतला. तसेच शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान, वापरण्यात येणारी अवजारे व शेतीच्या आधुनिक पद्धती यांची प्रत्यक्ष भेट देऊन अनुभव घेण्यात आले. विविध इयत्तांच्या व विषयांच्या अभ्यासक्रमातील घटक, उपघटकांची प्रत्यक्ष सांगड घालून शाळेतील शिक्षकांनी विविध अध्ययन अनुभूती दिल्या. निसर्ग शाळेत एकूण ६५ विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला. हिरव्यागार वनराईच्या संगतीत शिरापुरी, भजे-पुलाव या विशेष मध्यान्ह भोजनावर ताव मारला. सदरील उपक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक विठ्ठल कल्याणकर, सहशिक्षक गंगाधर ढवळे, मीरा चिवळे, छगन जाधव यांनी केले तर माजी उपसरपंच चांदू एडके, चांगोणा एडके, राजामाय नरवाडे, केशव नरवाडे, लिंगोजी गायकवाड, बापूराव गायकवाड, सुरेश गायकवाड, माधव वारकड यांनी परिश्रम घेतले.