शेतकऱ्यांना कर्ज माफीचे अर्ज करण्यासाठी पुन्हा मुद्दत वाढ द्या - राधाकृष्ण विखे पाटील

दुष्काळ मुक्ती साठी रेणुका मातेला साकडे

माहुर (सरफराज दोसाणी) राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून शेतकर्‍यांना कर्ज माफी जाहीर केली. मात्र आज शेतकर्‍यांना सरवर डाउनच्या इतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठि येणार्‍या अडचणी मुळे अद्याप संपुर्ण शेतकर्‍यांनी कर्ज माफीचे अर्ज भरलेले नाही. त्यामुळे शासनाने पुन्हा अर्ज करण्यासाठी मुदत वाढ द्यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.


नवरात्र निमित्त पहिल्या माळेला दरवर्षी प्रमाने विरोधी पक्ष नेते प्रथम दिनी माहुर दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांचा समवेत विखे पाटील कृषी परिषदचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर, नांदेड जिल्हाध्यक्ष विनित पाटील यांची उपस्थिती होती. कर्ज माफी देताना ती सरसकट देण्याची गरज असताना त्याला निकष लावण्याची गरज नव्हती.
राज्य सरकारने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू करायला पाहिजे होती. मात्र ती नसल्याने शेतकर्‍यांना अर्ज भरण्यात अनेक अडचणी येत आहेत.ग्रामीण भागात कोणत्याच कंपन्यांची इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नाही. आगोदर कर्ज माफी द्या व आत्ता आर्ज माफी द्या आशी मह्ण्याची वेळ आली आहे असे मत विखे पाटलांनी व्यक्त केले. आई रेणुकेचे सहपत्नीक दर्शन घेउन त्यांनी बळीराजांचे राज्य येउ दे, शेतकरी सुजलाम सुफलाम होउ दे, राज्य दुष्काळ मुक्त होऊ दे असे साकडे त्यांनी मातेला टाकले. यावेळी अविनाश टनमने, शशीमोहन थोंटे, निखील शिंदे यांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी