लघूशंकेच्या कारणावरून दोन गटातील तुंबळ हाणामारी

हदगावमध्ये एक तरुण ठार.. मयताच्या कुटूंबातील ७ जणांसह अन्य ५ जखमी    

नांदेड (एनएनएल) नांदेड जिल्ह्यातील हदगावमध्ये एका तरुणास घरासमोर लघवी करण्यास विरोध केल्याच्या कारणावरुन दोन कुटूंबातील गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत कैलास संभाजी मांजरे(२८) या तरुणाच्या छातीत जबर मार लागल्याने तो जागीच ठार  झाला.तर त्याच्या कुटूंबातील ७ जणांसह अन्य ५ जण जखमी झाले आहेत.

हदगांव शहरातील दत्तबर्डी रस्त्यावरील नाईक नगर तांडा येथे संभाजी मारोती मांजरे व विष्णु चंदू पवार या दोघांची घरे
एकमेकांच्या समोरा समोर आहेत.दि.१९ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री ९:०० वाजताच्या दरम्यान जेवन करुन माजरे कुटूंबातील सदस्य घराबाहेर अंगणात गप्पा मारत बसलेले असतांना विष्णू पवार हा लघवी करण्यासाठी अंगणात आला व त्याने लघवी केली. असे केल्याने मांजरे कुटूंबीयांनी आमच्या घरच्या बायका,पोरी व आम्ही सर्व जण येथे बसलेले असतांना आमच्या समोर लघुशंका करतोस तुला कांही वाटत नाही का ? असे म्हणून जाब विचारला.आणि परत असे करु नकोस म्हणून शेषेराव मांजरे यांनी हरकत घेतल्या वरून दोघात वाद झाला.

ह्या वादात दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी सहभाग घेतल्यामुळे भांडण होऊन त्याचे पर्यावसन तुंबळ मारहाणीत झाले. यावेळी मांजरे कुटूंबीयांवर विष्णू पवार, पिंटू आडे, शंकर पवार, मोहन पवार, संदीप पवार, विनोद पवार, विशाल पवार, सचिन पवार, अनू पवार, सिता पवार, सुरेखा पवार, ऊषा पवार यांनी जबर हमला चढवला. या मारहाणीत जळतणातले लाकूड, लोखंडी गज व दगड ईत्यादींचा मुक्तहस्ताने वापर करण्यात आला. यात कैलास संभाजी मांजरे (२८) या तरुणाला जबर मार लागल्याने ठार झाला.दवाखाण्यात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे वैधकिय अधिका-यांनी घोषीत केले.तसेच झालेल्या मारहाणीत मांजरे कुटूंबातील संभाजी मांजरे, शोभा मांजरे, प्रभू मांजरे, अंकुष मांजरे, श्रावणी मांजरे व ज्योती मांजरे हे जखमी झाले आहेत. ही घटना पोलीसांना समजताच पो.नि. केशव लटपटे, पो.उप.नि. दत्तात्रय वाघमारे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.परंतू तरुण ठार झाल्याचे समजल्यावरुन व पोलीस येत असल्याचे पाहूण पोलीस घटनास्थळी येण्यापुर्वीच सर्व आरोपींनी तेथून पळ काढला. दरम्यान वडार समाजातील तरुणाचा खून झाल्यामुळे समाज एकत्रीत झाला व काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. तसेच या जमावाने जो पर्यंत आरोपींना अटक होणार नाही. तोपर्यंत मयत कैलास मांजरे यांचे शव ताब्यात घेणार नाही असा पावित्रा घेतला. दरम्यान भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके हे घटनास्थळी पोहचले व त्यांनी संतप्त जमावाची समज काढली आणि तपासाला गती दिली. तसेच त्यांनी आरोपींना लवकरच अटक करु असे आशवस्त केल्यामुळे तणाव निवळला.

आरोपींच्या व मयताच्या कुटूंबीयांत गणेशोत्सव काळात वाद होऊन मारहाण झाली होती. तांड्यातील कांही प्रतिष्ठीत स्थानिकांनी दोन्ही कुटूंबीयांना समोरा समोर बसवून तो वाद मिटवला होता. तर भोकरचे अप्पर पोलीस अधिक्षक अधिक्षक अविनाश बारगळ यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. या वरीष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली फरारी आरोपींच्या शोधार्थ तीन पोलीस पथक स्थापन करण्यात आले असून तपासचक्र गतीमान करण्यात आले आहेत. या प्रकरणी शेषेराव संभाजी मांजरे (२४) रा. नाईक नगर हदगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हदगाव पोलीसांत ८ जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील अधिक तपास पो.नि. केशव लटपटे हे करत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी