जलयुक्त शिवारच्या बोगस बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी गेले वाहून

कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून बंधाऱ्याची पुनर्बांधणी करा 
   
हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यात जलयुक्त शिवाराची कामे थातुर - मातुर करण्यात आल्यामुळे पावसाचे पडलेले पाणी पूर्णतः वाहून गेले आहे. याचे ज्वलंत उदाहरण दुधड येथील जलसंधारण विभागाच्या बंधाऱ्याच्या बोगस कामावरून उघड झाले आहे. परिणामी येणाऱ्या काळात या भागातील शेतकरी, जनावरे व सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असल्याने यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

दुष्काळ निवारणासाठी राज्यभरात मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेला राज्य सरकारने ३१ मार्च २०१६ ला काढलेल्या निर्णयानुसार राबविण्यास सुरुवात केली. शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी जलसंधारणांतर्गत उपाययोजना करत एकात्मिक पद्धतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार करून राबविल्यास पिण्याचे पाणी व पिकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था करता येईल. या उद्देशाने सर्वासाठी पाणी – टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ यासाठी ‘जलयुक्त शिवार अभियान’ राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. या योजनेतून पावसाचे जास्तीतजास्त पाणी गावात शिवारातच अडविणे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, अस्तित्वात असलेले व निकामी झालेल्या जलस्रोतांची पाणीसाठवण क्षमता पुनर्स्थापन करणे, पाणी अडविणे, जिरविणे याबाबत जनतेला प्रोत्साहित करून लोकसहभाग वाढविणे ही या अभियानांची उद्दिष्टे होती. या योजनेअंतर्गत सलग संमांतर चर खोदणे, दगडी बांध बंधणे, जुनी भातशेती दुरुस्त करणे, सिमेंट बंधारे बंधणे, मातीचे बंधारे बांधणे, शेततळी खोदणे, जुन्या बांधांची दुरुस्ती आदी कामी हाती घेण्यात आली. यातून नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यात चांगली कामे झाल्यामुळे दूरदूरपर्यंत पाणीसाठा जमा होऊन जलस्रोत वाढल्याचे उदाहरणे दिसत असताना हिमायतनगर तालुक्यात याउलट चित्र दिसत असल्याने उदघाटन अगोदरच बंधारा कोरडा पडल्याचे चित्र दिसून येत आहे.  

असाच कांहींसा प्रकार हिमायतनगर तालुक्यातील मौजे दुधड गावानजीक असलेल्या नाल्यावरील बंधाऱ्याच्या कमावरुज उघड झाला आहे. येथील नाल्यावर ग्रामविकास व जलसंधारण विभाग लघु सिंचन (जलसंधारण) विभागाच्या अंतर्गत जलयुक्त शिवार अभियानातून सॅन २०१६-१७ अंतर्गत  बंधाऱ्याचे काम करण्यात आले. सदर बंधाऱ्याचे काम करताना राजकीय वरद हस्तामुळे संबंधित गुत्तेदाराने या ठिकाणी माहिती फलक लावला नाही. तसेच कामात निकृष्टपणा आनल्यामुळे जून महिन्यात झालेल्या पावसाने सादर बंधारा वाहून गेला होता. हा प्रकार उघड होऊन नये म्हणून संबंधित गुत्तेदाराने पाऊस उघडताच बंधाऱ्याच्या कामात मोठं - मोठाले टोळके दगड भरून काम थातुर - मातुर पद्धतीने पूर्ण केले. तसेच काम करताना हलक्या प्रतीचे सिमेंट वापरण्यात आल्याने बंधाऱ्याची गुणवत्ता ढासळली आहे. बंधाऱ्यासोबत नाल्याचे सरळीकरण करण्यात आले असून, मातीच्या बांधावर दगडाने पिचिंग केली नसल्याने मातीचा मलबा पावसाच्या पाण्याने खाली आला आहे. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी साठून राहण्याऐवजी मातीच्या मलब्याचे ढिगारे दिसून येत आहेत. एवढेच नव्हे तर सदर गुत्तेदाराने या बंधार्यास गेट लावले नसल्याने पावसाचे सर्व पाणी वाहून गेल्यामुळे जलयुक्त शिवार योजनेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. या बंधाऱ्याची खर्च करण्यात आलेल्या लाखोंचा निधी वाया गेला आहे. परिणामी या बंधाऱ्याचा कोणताही फायदा परिसरातील शेतकऱ्यांना झाला नसल्याने या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी, गावकरी व विकासप्रेमी नागरीकातून केली जात आहे.  

हिमायतनगर तालुक्यात जलसंधार विभागाकडून ५ बंधाऱ्याचे ई- टेंडरिंग निघाले होते, पाचही बंधारे एकच व्यक्तीला देण्यात आली. दुधड परिसरात दोन बंधारे होती, त्यापैकी एकच करण्यात आला असून, तोही निकृष्ठ पद्धतीचा करून शासनाला चुना लावल्या गेला आहे. त्यामुळे बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही साचला नसल्याने शेतकऱ्याला कोणताही फायदा झाला नाही. तासेच एका बंधारा केला नसल्याने कुठे कागदावर पूर्ण करून रक्कम उचलण्यात तर आली नाही ना..? अशी शंका उपस्थित करून शासनाचा  निधी पाण्यात गेला आहे. या गैरकारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रामदास वाळके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हिमायतनगर तालुक्यात सदर योजनेसाठी कोट्यवधीं रुपयाचा निधी मंजूर करून बंधारे, ढाळीचे बांध यासह विविध कामे तीन वेगवेगळ्या कृषी, जलसंधारण, वनविभागाच्या खात्यातून करण्यात आली.  मात्र योजनेची अंमलबजावणी करताना त्यावर देखरेख करणारे, अधिकारी, अभियंता व संबंधित गुत्तेदाराने शासनाच्या उद्देशाला हरताळ फासत बोगस कामे केली. त्यामुळे तालुक्यात झालेल्या कामाची सविस्तर माहिती संबंधित विभागाकडे माहिती अधिकाराचा अर्ज देऊन मागितली. मात्र संबंधितांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे तालुक्यात करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि संबंधित गुत्तेदारचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष गजानन ठाकरे यांनी केली आहे.      

याबाबत बंधाऱ्याची कामे ज्यांच्या देखरेखीखाली करण्यात आली त्या संबंधित अभियंता फुलारी यांच्याशी दूरध्वनीवरून माहिती व प्रतिक्रीय विचारण्यासाठी सम्पर्क केला. मात्र त्यांनी फोन उचलणे टाळल्यामुळे बंधाऱ्याच्या बोगस कामाला त्यांचे अभय असल्याचे जाणवू लागले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी