दलीतमित्र निवृतीराव लोणे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

अर्धापूर (नागोराव भांगे) संपूर्ण विश्वची आपुले घर समजून दिन, दुबळ्यांवर प्रेम करून वयोवृद्ध, निराधार - निरश्रीत लोकांना आश्रय देणारे दलित मित्र कालवश निवृतीराव लोणे यांच्या सातव्या पुण्यतिथी निमित्त दि. २३ - शनिवारी लोणी  ( खु. ) येथे विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. 

धम्म कार्यात स्वतःला पुर्णपणे झोकून देऊन
लहानच्या माळटेकडीवर तपोवन बुध्दभूमी साकार करून तेथे नियमित अखिल भारतीय बौध्द - धम्म परिषदेच्या आयोजनातून देशविदेशातील विद्वान भिक्खू संघाकडून सर्वांना तथागताचा धम्म देण्याचे पवित्र कार्य कालवश निवृतीराव लोणे यांनी सुरू केले.  पण हा धम्माचा रथ पुढे नेत असतानाच दि. २३ सप्टेंबर २०१० रोजी ते आपल्यातून कायमचे निघून गेले. परंतु त्यांनी सुरू केलेले हे कार्य त्यांच्या वारसदारांनी अखंडपणे सुरू ठेवले आहे. कालवश निवृतीराव लोणे यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त दि. २३ - शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

लोणी (खु.) येथील त्यांच्या समाधीस्थळी श्रीमती देऊबाई प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शनिवारी  सकाळी ११.०० वाजता त्यांच्या पुतळ्यासमोर पुज्य भदन्त उपगुप्त महाथेरो, पुज्य भदंत पय्यारत्न, पुज्य भदंत नागशेन बोधी, पुज्य भदंत सुभूती, पुज्य भदंत शिलरत्न यांच्या हस्ते पूजापाठ व धम्मदेशना देण्यात येणार असून याच दिवशी दुपारी रक्तदान शिबीर व वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सायंकाळी महाउपासक डाॅ. एस. पी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय देशमुख लहानकर यांच्या हस्ते व नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संजय लोणे यांच्या प्रमुख उपस्थितीत निराधार - निरश्रीत वयोवृद्धांना कपडे वाटप करून उपस्थितांना भोजनदान देण्यात येणार आहे. या कार्यक्रमानंतर रात्री सुप्रसिद्ध कवी गायक भिमशाहीर बबनराव दिपके व बालाजी लोणे यांच्या संगीत गीत गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त बौध्द अनुयायी व नागरिकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन श्रीमती आनूसयाबाई लोणे, राजेश लोणे, नागशेन लोणे यांनी केले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी