अर्धापुरात वेगवेगळ्या उपक्रमाने नरेंद्र मोदीचा वाढदिवस साजरा

अर्धापूर (नागोराव भांगे) देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस विविध  उपक्रमाने साजरा करण्यात आला. यानिमित्त दि. १७ - रविवारी अर्धापूर  शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप करून दवाखाना परिसराची साफसफाई करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 


पंतप्रधान नरेंद्रजी मोदीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील कदम यांच्या नेतृत्वाखाली रविवारी अर्धापुर तालुका भाजपच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील पन्नास रूग्णांना फळे वाटप करण्यात आले. त्यानंतर याच आरोग्य केंद्राचा परिसर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वच्छ केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दृष्टीने स्वच्छ, सुंदर, विकसित व आधुनिक देश घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन त्यांचे स्वप्न साकार करावेत. असे आवाहन तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील कदम यांनी केले. 

याच कार्यक्रमात भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने रमाकांत राऊत, प्रसाद सिनगारे, गजानन माटे, ओमकार नवले यांनी दुर्गानगर वस्तीशाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर  पाटील कदम, भाजयुमोचे उपजिल्हाध्यक्ष सुनिल पा. शिंदे, प्रदेश सचिव सखाराम क्षीरसागर, मा. जि. प. सदस्य रामराव भालेराव, शहराध्यक्ष  योगेश हाळदे, विलास साबळे, अॅड. पी. एम. सरोदे, सुधाकर मुळे, बाबुराव लंगडे, जगन देशमुख, अमोल कपाटे, प्रभु कपाटे, सचिन काय कल्याणकर, तुकाराम माटे, वैभव माटे, मारोती मोरे, आनंद सिनगारे, नागेश माटे, संतोष मुंगल, व्यंकटी लंगडे, राम गीरी, योगेश देशमुख, अजय देशमुख, गजानन देशमुख, चेअरमन रावसाहेब गव्हाणे, गोविंद माटे, प्रल्हाद माटे, सुरेश वळसे, बालाजी वळसे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी