काष्‍ट्राईब संघटनेच्या कर्मचारी महासंघ राज्‍य सरचिटणीसपदी निवड

नांदेड (एनएनएल) जिल्‍हा परिषदेतील काष्‍ट्राईब संघटनेचे ज्‍येष्‍ठ नेते सतिश कावडे यांची काष्‍ट्राईब कर्मचारी महासंघाच्‍या राज्‍य सरचिटणीसपदी निवड झाली आहे.

जिल्‍हा परिषदेच्‍या जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागात कार्यरत असणारे काष्‍ट्राईब संघटनेचे ज्‍येष्‍ठ नेते सतिश कावडे हे मागील पंधरा वर्षापासून जिल्‍हा परिषदेमध्‍ये कार्यरत आहेत. जिल्‍हा परिषद
काष्‍ट्राईब संघटनेच्‍या अध्‍यक्षपदी मागील तेरा वर्षापासून ते कार्यरत होते. नांदेड जिल्‍हा कास्‍ट्राईब महासंघाचे कार्याध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष आदी पदावर त्‍यांनी काम केले आहे. जिल्‍हा परिषद कर्मचारी संघटनेत त्‍यांनी महत्‍वाचे योगदान दिले आहे. कर्मचा-यांच्या प्रश्‍न सोडविण्‍याचे कौशल्‍य आणि मधुर संवादक म्‍हणून ते सर्वांना परिचित आहेत. जिल्‍हास्‍तरावर आपल्‍या कार्यकौशल्‍यातून कर्मचा-यांच्‍या अनेक प्रश्‍न त्‍यांनी सोडविले आहेत. त्‍यांच्‍या या अनुभवाचा फायदा राज्‍यपातळीवर महासंघास व्‍हावा. याकरीता महासंघाचे अध्‍यक्ष कृष्‍णा इंगळे यांनी कास्‍ट्राईब/जि.प./171/2017 दिनांक 15.07.2017 या पत्राआदेशाव्‍दारे कास्‍ट्राईब जिल्‍हा परिषद कर्मचारी संघटनेच्‍या राज्‍य सरचिटणीपदी सतिश कावडे यांची निवड केली आहे.

राज्‍य सरचिटणीपदी सतिश कावडे यांची निवड झाल्‍याबद्दल महासंघाचे अध्‍यक्ष कृष्‍णा इंगळे, अतिरिक्‍त राज्‍य सरचिटणीस अशोक गोडबोले, महासंघाचे जिल्‍हाध्‍यक्ष एस.के.कदम, सरचिटणीस जिवन कांबळे, कार्याध्‍यक्ष भिमराव हटकर, माजी अध्‍यक्ष डी.आय.गायकवाड, आर.डी.क्षिरसागर, राजभोज, दिपक उगलवाड, यू.एस.कोमटे, व्‍ही.आर.असोरे, जिल्‍हा परिषद काष्‍ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्‍यक्ष श्‍याम कावळे, कार्याध्‍यक्ष व्‍ही.व्‍ही.कांबळे, सरचिटणीस पवन तलवारे, आर.एस.खरात, रंजित गजभारे, सुनिल कदम, भगवान एडके, इंजिनियर एस.एम.वारकड, एस.एम.ओव्‍होळ, राजेश जोंधळे, विजय वाघमारे, मांडे, इंजिनियर डि.पी.शिंदे, जे.एम.वाघमारे, सौ.छाया कांबळे, सौ.वरवटकर, श्रीमती इंदूताई वाघमारे, पी.डी.चौदंते, इंजिनियर रेखा दिपके, सुर्यकांत महाजन, गोळे, एस.पी.गोखले, कैलास सराटे, श्रीमती आळंदीकर, रामकृष्‍ण पांडे, सुनिल कुलकर्णी, संजय राऊत, काष्‍ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्‍हाध्यक्ष विजयकुमार ढवळे, सचिव शिवाजी टोंम्‍पे, भूमिअभिलेख विभागाचे संजय इंगळे, पाटबंधारे विभागाचे डी. जी. सोनकांबळे, काष्‍ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्‍हा प्रसिध्‍दी प्रमुख डॉ. नंदलाल लोकडे आदींनी त्‍यांचे अभिनंदन केले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी