प्रेमचंदानीचे खंडणीची सात लाख जप्त करण्यासाठी

सहा युवकांची पोलीस कोठडी वाढली 
नांदेड (एनएनएल) शहरातील किंग कलेक्शनच्या मालकाकडून सात लाखाची खंडणी वसुल करण्याच्या आरोपातील सहा युवकांची पोलीस कोठडी आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आदिती नागोरी यांनी दोन दिवसासाठी वाढवून दिली आहे.
दि.24 जून 2016 रोजी एकाच दिवशी तीन खंडणीचे गुन्हे वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्या गुन्ह्यांचा
तपास स्थानिक गुन्हा शाखेतील विविध अधिकाऱ्यांकडे आहे. या प्रकरणी जगजितसिंघ उर्फ जग्गी दिलबागसिंघ संधू, मनप्रितसिंघ उर्फ सोनू सुरजनसिंघ औलख, ईश्र्वरसिंघ उर्फ लाली मुक्तारसिंघ रंधावा, रणजितसिंघ उर्फ सोनी सुच्चासिंघ चिमा, करमजितसिंघ उर्फ ऋषि मनजितसिंघ भाटीया, रणजितसिंघ उर्फ राजबिरसिंघ उर्फ रज्जू करमजितसिंघ तबेलेवाले या सहा युवकांना अटक झाली.  खंडणीच्या तीन गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात मकोका कायदा वाढविण्यात आला. त्यात मकोका न्यायालयाने सुध्दा या युवकांना पोलीस कोठडी दिली होती.मकोका न्यायालयाची कोठडी संपल्यानंतर किंग कलेक्शनचे मालक मयूर हुकूमत प्रेमचंदानी याच्याकडून 7 लाख रुपयांची खंडणी वसुल केली म्हणून या युवकांना 18 ते 22 जुलै अशी पोलीस कोठडी देण्यात आली होती. चार दिवसाच्या पोलीस कोठडीत पोलिसांनी हे सात लाख रुपये जप्त केले नाहीत. आज पोलीस उपनिरीक्षक सदानंद वाघमारे, विनायक शेळके, अनेक पोलीस कर्मचारी आणि हत्यारबंद क्युआरटी पथकाचे जवान यांनी या सहा जणांना न्यायालयात हजर केले. खंडणीचे सात लाख रुपये जप्त करणे आहे आणि फरार आरोपींचा शोध घेणे आहे या कारणासाठी पोलीस कोठडी मागितली. ती न्यायाधीश नागोरी यांनी दोन दिवस अर्थात 24 जुलै 2017 पर्यंत मंजूर केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी