निराधारांच्या मागण्यासाठी तालुका कांग्रेस कमेटी मागासवर्गीय विभागाचे निवेदन

हिमायतनगर (प्रतिनिधी) तालुका कांग्रेस कमेटी मागासवर्गीय विभागाच्या वतीने नीराधारांच्या विविध मागण्यासंदर्भात मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना तहसीलदार हिमायतनगर यांचा मार्फत दि.07 बुधवारी निवेदन देण्यात आले.

गेल्या काही दिवसापासून निराधारांच्या समस्यांकडे सत्ताधार्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. एवढेच नव्हे तर मानधन वाटपात निराधार समितीच्या काही सदस्यांनी मनमानी कारभार तथा ढवळाढवळ सुरु करून  भेदभाव केला जात असल्याने मानधन उपलब्ध होऊनही काँग्रेसच्या काळातील मंजूर लाभार्थीच्या  मानधन वितरणास विलंब केला जात आलस्याच्या तक्रारी होत आहे. तर नव्याने प्रस्ताव दाखल करूनही प्रस्तावास मंजुरी देण्यासाठी तहसील कार्यालयाकडून जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचा आरोप तहसील व समितीच्या सदस्यांच्या घराचे उंबरवठे झिजवणाऱ्या वंचित निराधार महिला - पुरुषातून केला जात आहे. हि बाब लक्षात घेऊन दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, काँग्रेस तालुका अध्यक्ष विकास पाटिल देवसरकर, डॉ.प्रकाश वानखेडे, मागासवर्गीय विभागाचे तालुका अध्यक्ष कानबा पोपलवार व मागासवर्गीय विभागाचे उपाध्यक्ष पांडुरंग गाडगे यांच्या प्रमुख उपस्थितित निर्धारणाचा हक्क त्यांना देऊन हातभार लावावा अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले. सादर निवेदनात संजय गांधी निराधार योजनचे अनुदान 600 (सहाशे) वरुण (2000)दोन हजार रुपए करण्यात यावे, संजय गांधी निराधार समितिची बैठक दर 3 महीन्याने घेण्यात यावी, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचा दारिद्रय रेषेच्या यादीत समावेश करण्यात यावा, निराधार अपंग लाभार्थ्याना अनुदान वाटप करण्यासाठी महिन्यातून एक दिवस देण्यात  यावा, सर्वआर्थिक महामंडळाचे कर्ज प्रकरण तात्काळ निकाली काढण्यात यावे आणि  निराधार योजनेचा  लाभ मिळण्यासाठी असलेली उत्पन्न मर्यादा 21000 हजारहुन 1 लाख रुपए करण्यात यावी यासह अन्य  मांगण्याचे निवेदन मुख्यमंत्री यांना तहसीलदार हिमायतनगरच्या मार्फत देण्यात आले. यावेळी गजानन वानखेडे, संजय लुम्दे, आनंद मुतनेपाड, विजय सूर्यवंशी, आशीष सकवान, प्रफुल्ल मुधोळकर, मनोज पाटिल, संजय माने, नागोराव शिंदे, संजय कवडे, शेषेराव पाटिल, सय्यद मन्नान भाई, विष्णु जाधव, पंडित ढोने, दिगंबर दरेवाड, राजेश चिकनेपाड, संतोष साभळकर, अमोल गोखले, पिंटू पाईकराव, दीपक सोंनसळे, मंगेशकर खडकीकर, शेख मुजीब, अनिल पवार, आदिसह मोठ्या प्रमाणात कांग्रेस पार्टीच्या सर्व विभागाचे कार्यकर्ते व नीराधारांची उपस्थिति होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी