हिमायतनगर(अनिल मादसवार)खडकी बा. गावातील परवानाधारक दारुचे दुकान बंद होऊनही गावात अवैद्य दारू विक्रीमुळे पुन्हा महापूर वाहू लागला आहे. परिणामी महिला वर्गाना दारुड्यांच्या त्रास सहन करावा लागत आहे. याला कंटाळलेल्या महिलांनी दि.19 सॊमवारी झालेल्या ग्रामसभेच्या विशेष बैठकीत राजरोसपणे केल्या जाणाऱ्या दारू विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी महिलांनी केली. तसा ठरावही उपस्थितांच्या एकमताने ग्रामपंचायतीचे अधिकारी - पदाधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्याने अवैद्य धंदे चालकात एकच खळबळ उडाली आहे.
मागील काळात तालुक्यातील मौजे खडकी बा. गावात सुरु असलेल्या परवानाधारक दुकानदाराला दारूचे दुकान बंद करण्यासाठी येथील महिलांनी एल्गार पुकारून दुकान बंद करण्यास भाग पडले होते. तसेच मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय गाठून दारूबंदीसाठी मतदान घेण्याची मागणी केली होती. याची दाखल घेऊन परवानाधारक दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला. त्यामुळे गावातील दारूचा त्रास बंद झाला होता. परंतु काही वर्षाने पुन्हा गावात काही अवैद्यधंदे चालकानी दारूचा गोरखधंदा सुरु केला आहे. त्यामुळे गावातील शेतकरी, मजुरदार, युवक दारूच्या आहारी गेल्याने अनेकांचे संसार व जीवन उध्वस्त होत आहे. हि बाब लक्षात घेऊन अनेकदा विक्रेत्यास सांगितले, त्यानंतर पोलिसांना बंद करण्याची मागणी केली. परंतु याचा काहीच उपयोग झाला नसल्याने अखेर गावात होणार्या दारू विक्रीला आळा घालण्यासाठी दि.19 सोमवारी वॉर्ड क्रमांक 04 मध्ये माता जगदंबा देवीच्या मंदिरासमोर बैठक संपन्न झाली. यावर अंकुश ठेवण्यासाठी दोनपंच कमिट्या तयार करण्यात आल्या असून, मुख्य समितीच्या अध्यक्षपदी अनिल बन्सीलाल पवार, कोषाध्यक्ष वसंत राठोड, उपाध्यक्ष साहेबराव कारभारी, सचिव गजानन यलकदरे (सरपंच), सहसचिव रामराव कावळे(तंटामुक्त समितीचे अध्यक्ष), सल्लागार पांडुरंग गाडगे (पत्रकार), सदस्य नामदेव सातलवाड, विनोद जाधव यांच्यासह अनेकांची निवड करण्यात आली. तर वॉर्ड क्रमांक चार मधील दुसऱ्या समितीत अध्यक्ष रवी पवार, उपाध्यक्ष सौ.चंद्रकालाबाई गणेश मुनेश्वर, सुनील पवार, कविताबाई पवार, सुमनबाई जाधव, बालाजी राठोड, विमलबाई माधव भुरे, विमलबाई राठोड, जिजाबाई दंतेवाड, रुक्माबाई जाधव, शीतलबाई सातलवाड, राधाबाई कलाले, अंजनाबाई कलाले, सुंदराबाई पवार, सविताबाई राठोड, पुष्पाबाई जाधव, राधाबाई जाधव, वसंत पवार, लक्ष्मण राठोड, गजानन राठोड, कृष्ण जाधव, कैलास जाधव, देविदास राठोड, अनिल जाधव, महावीर पवार आदींचा यात समावेश आहे. या बैठकीस गावातील महिवाल - पुरुष मंडळींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून दारू बंदी झालीच पाहिजे असा ठराव महिलांनी मांडल्यानंतर उपस्थितांनी दारूबंदीच्या ठरावाला एकमताने मंजुरी दिली. आगामी काळात गावातील सर्वच वार्डात बैठक घेऊन गुप्त पद्धतीने विक्री होणाऱ्या दारू विक्रीला चाप बसविला जाणार असल्याचे महिलांनी सांगितले. यावेळी ग्रामसेवक एम.के.राहुलवाड यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला - पुरुषांसह अनेकांची उपस्थिती होती.
