हिमायतनगर(प्रतिनिधी)शहर व ग्रामीण भागात गणेशोत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात झाली असून, तालुक्यात जवळपास 73 हुन अधिक गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु महावितरण कंपनीच्या अधिकारी - कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे विजेचा लपंडाव सुरु असल्याने गणेश भक्त वैतागले आहेत. तात्काळ सुरळीत वीजपुरवठा करावा अन्यथा भक्तांचा उद्रेक होईल असा इशाराही अनेकांनी दिला आहे.
हिमायतनगर तालुक्याचा कारभार नवीन अधिकाऱ्यांनी संभाळल्या पासून शहरासह ग्रामीण भागात अघोषित भारनियमन ताठ विजेचा लपंडाव सुरु झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात तरी सुरळीत वीजपुरवठा करावा अशी मागणी गणेश भक्तांनी केली होती. यासाठी महावितरण कंपनीने दोन दिवस शहरच विद्दुत पुरवठा खंडित करून दुरुस्त्या केल्या. परंतु यात महावितरण कामपणीचा हलगर्जीपणा झाल्यामुळे दिवसातून अनेकदा यावेळी वीज पुरवठा गुल होत आहे. परिणामी महावितरणचा शोख सेवा बाजवण्याचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून, गणेशोत्सवात बालगोपाल, तरुणाई, अबाल वृद्ध उत्सहात असताना वारंवार वीजपुरवठा खंडित होऊ लागल्याने विजेचा नाहक फटका गणेश भक्तांना, गौरीच्या आगमनाला व बकरी ईदच्या उत्सवाच्या तयारीत असलेल्याना सहन करावा लागत आहे. वीजदेयके वसुलीप्रमाणे सेवा देण्यास कुचराई करणाऱ्या अधिकारयांच्या मनमानी कारभाराला वरिष्ठांनी चाप लावावा. आणि विघ्नहर्त्याच्या उत्सवावर येणारे महावितरणचे विघ्न दूर करावे अशी मागणी गणेश भक्तामधून जोर धरत आहे.
वारंवार होणार खंडित वीजपुरवठा सुरळीत करून आगामी उत्सवात गणेश भक्तांना विनाखंड वीजपुरवठा करण्यात यावा. तसेच गणेशोत्सव बरोबरचा नागरिक व शेतकऱ्यांना महावितरच्या मुजोर अधिकाऱ्यांनी वेठीस धरू नये अन्यथा महावितरणला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागेल असा इशारा गणेश भक्त, शेतकरी, सामान्य वीज ग्राहकांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.