हिमायतनगर तालुक्यातील 53 गावात एक गाव एक गणपती संकल्पना

हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यातील 53 गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबविली जात आहे. हि बाब हिमायतनगर तालुक्यासाठी भुशनावह आहे, याचा आदर्श सर्व गावातील नागरिकांनी घेवून लोकमान्य टिळकांनी घालून दिलेला एकसंघतेचा उद्देश सफल करावा असे आवाहन पोलिस निरीक्षक  विठ्ठल चव्हाण यांनी केले. 

हिमायतनगर येथील हिंदू - मुस्लिम बांधव गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक शांतता व बंधुभावाची परंपरा जोपासत सन- उत्सव साजरे करतात. दरवर्षी होणारा
दुष्काळ व महागाई वाढतच आहे, या काळात सन उत्सव सार्वजनिक रित्या साजरे करेने गरजेचे आहे. शहरासह तालुक्यातील 73 गणेश मंडळाने आमच्याकडे परवान्यासाठी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी वारंगटाकळी, धानोरा, कार्ला पी, सिबदरा, खैरगाव ज, खैरगाव, मंगरूळ, बोरगडी, सवना ज, वाशी, दुधड, वाळकेवाडी, पळसपूर, सिरपल्ली, घारापुर, टेम्भूर्णी, पवना, उखळवाडी, दगडवाडी, चीचोर्डी, पिछोन्डी, वाई, कोठा ज., कोठा तांडा, आंदेगाव, पार्डी, दरेसरसम, दिघी, सोनारी, धनवेवाडी, आदीसह 53 गावात एक गाव एक गणपती तर इतर २० गावात गणेशची स्थापना झाली असून, आणखी काही गावातील प्रस्ताव येणे बाकी आहेत. एक गाव एक गणपती हि संकल्पना सर्वच गावांनी राबविली पाहिजे, अश्या उपक्रमामुळे गावातील आपसी मतभेद दूर होऊन एकमेकाप्रती प्रेम भावना दृढ होऊन सन - उत्सवाचा आनंद द्विगुणित होतो. तसेच हिमायतनगर सारख्या एकट्या शहरात 17 गणेश मंडळाने परवानग्या घेवून स्थापन केली आहेत. दरम्यानच्या काळात उत्सव साजरे करताना सर्वांनी न्यायालायाच्या आदेशाचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे. तसेच गणेश भक्तांनी सामाजउपयोगी, सध्याच्या घडामोडीवर आधारित देखावे सादर करून लोकमान्य टिळकांनी घालून दिलेला आदर्श जोपासत उत्सव साजरा करावा. शासन लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव, लोकमान्य उत्सव राबविण्याचा शासनाचा निर्णयसाठी प्रयत्न करीत आहे, या स्पर्धांमध्ये गणेशमंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस निरीक्षक विठ्ठल चव्हाण यांनी केले.

दरम्यान कोणतीही अडचण उद्भवल्यास आमचे पोलिस कर्मचारी आपल्या सहकार्यासाठी सदैव तत्पर असून, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करावे असे सांगून, गणेशोत्सव, बकरी ईद पार पाडावी म्हणून  पोलीस निरीक्षक विठ्ठल चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक नितीन गायकवाड, राजेश घुन्नर, संदीप आणेबोईनवाड आदीसह 40 हून अधिक पोलिस संचाचे शहरातील मुख्य रस्त्यावरून पथसंचालन (रूट मार्च) करण्यात आले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी