हिमायतनगर (प्रतिनिधी) शहरात आज दिवसभर महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे खंडित विद्दुत पुरवठ्याचा सामना राष्ट्रीयकृत बैन्केसह सर्वच शासकीय – निमशासकीय कार्यालयं बसला आहे. दिवसभर कामकाज ठप्प झाल्यामुळे, कामानिमित्त शहरात आलेल्या नागरिक व शेतकर्याना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गेल्या महिन्याभरापासून शहर व परिसरात महावितरण कंपनीने लपंडावाचा खेळ चालविला आहे. नियमानुसार देयके भरूनही सुरळीत वीज पुरवठा केला जात नाही. असाच काहीसं अनुभव आज दि.22 गुरुवारी शहरवासीयांना व ग्रामीण भागातील नागरिकांना आला असून, याचा फटका भारतीय स्टेट बैंक, स्टेट बैंक ऑफ हैद्राबाद, महाराष्ट्र ग्रामीण बैंक, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बैंक, बुलढाणा अर्बन बैंक यासह शासकीय तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमिअभिलेख, ट्रेझरी, रजिस्ट्रार, दुय्यम निबंधक, पोस्ट कार्यालय, तालुका कृषी, पोलीस ठाणे, नगरपंचायत यासह, सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालयांना बसला आहे. या सर्वच याठिकाणचे व्यवहार व कारभार हे ऑनलाईन चालत असून, विद्दुत पुरवठा खंडित झाल्याने काम बंद असल्याचे बोर्ड लावण्याची वेळ त्यांच्यावर अली होती.
हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या शेतकरी, सामान्य नागरिकांच्या कामकाजात अडथळे निर्माण होऊन त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. महावितरण कंपनीचा कारभार काही दिवसापासून ढेपाळयाने सामानय नागरिक व वीज ग्राहक सुद्धा वैतागले असून, या कारभारात लवकरात लवकर सुधारणा करून सुरळीत वीज पुरवठा करावा. अन्यथा कोणत्याही क्षणी नागरिकांचा उद्रेक झाल्यास महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांना रोषाचा समान करावा लागेल असा इशारा नागरिक खाजगीत बोलताना देत आहेत.
याबाबत महावितरणचे कनिष्ठ अभियंता श्री सुरोशे यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा फोन बीजी होता. लाईनमन राम चव्हाण याना विचारांनी केली असता ते म्हणाले कि, उमरखेड येथून विद्दुत पुरवठा खंडित आहे. सायंकाळी 5 वाजता चालू होईल. असे त्यांनी सांगितले. परंतु शहरातील पूर्ण विद्दुत पुरवठा सुरळीत व्हायला 4.45 वाजले होते. त्यानंतरही रुख्मिणीनगर भागात विजेचा लपंडाव सुरूच होता. हा प्रकार वारंवार होत असल्याने या भागासाठी स्वतंत्र डीपी उभारण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.