पावसाच्या पाण्याने बांधकाम विभागाच्या निकृष्ठ कामाचे पितळे उघडे

हिमायतनगर(प्रतिनिधी)गेल्या काही महिन्यापूर्वी हिमायतनगर- भोकर रस्त्याची कोट्यावधीच्या निधीतून दुरुस्ती करण्यात आली. मात्र दमदार पावसाने पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, बांधकाम विभागाच्या निकृष्ठ कामाचे पितळे उघडे पडले आहे.

सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाच्या वतीने नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्यात कोट्यावधीचा  निधी खर्चुन डांबरीरस्ते, त्याची डागडुजीसाठी खर्च करण्यात आला. उन्हाळ्यात करण्यात आलेल्या कामात गुत्तेदाराने डांबरात रॉकेल मिश्र करून थातुर - मातुर काम केल्याच्या तक्रारी त्यावेळी करण्यात आल्या. परंतु याकडे संबंधित विभागाचे कार्यकारी, उपकार्यकारी, उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी जाणीव पूर्वक दुर्लक्ष करून शासनाला चुना लावला असल्याचे आता उघड होऊ लागले आहे. कारण यावर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या तुरळक दमदार पावसाने हिमायतनगर ते भोकर - हदगाव रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. तसेच तालुक्यातील बोरी, पळसपूर, एकघरी, आंदेगाव, मंगरूळ, सवना, दरेसरसम, दुधड सह अन्य रस्त्याची चाळणी होऊन रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ते हे वाहनधारकांना काळात नसल्याने वाहने खड्ड्यात आदळून पाट्या तुटणे, शॉकप निकामी होणे, यासह दुचाकीचालकांच्या कमरेत लचक भरणे यासह अन्य प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच खड्ड्यामुळे पैदल चालणाऱ्याना मोठा त्रास सहन करत वेळ प्रसांगी अपघाताला सामोरे जावे लागत आहे. एकूणच करण्यात आलेली निकृष्ठ कामाचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक बोलून दाखवीत आहेत. या प्रकाराकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी व शासनाच्या बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी लक्ष देऊन हिमायतनगर तालुक्यात झालेल्या रस्ते बांधकामासाठी मंजूर निधीच्या कामांची गुणनियंत्रक मापक मशीनद्वारे चौकशी करून निकृष्ट कामे करणारया गुत्तेदारावर दंडात्मक कार्यवाही करावी. आणि अश्या कामना अभय देऊन देयके काढण्यासाठी मदत करणारया अभियंत्यांची उचलबांगडी करून शासणाच्या निधीचा अपव्यय थांबवावा. तसेच खड्डेमय झालेल्या रस्त्याची दर्जेदार पद्धतीने निर्मिती करून सामान्य नागरिक, वाहनधारकांना सुरक्षा द्यावी अशी रास्त मागणी केली जात आहे.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी