हिमायतनगर तालुक्यात मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने वाडगावसह अनेक गावाच्या पुलावरून पाणी जाऊ लागल्याने दोन ते तीन तास मार्ग बंद पडले होते.
दि.22 गुरुवारच्या मध्यरात्री 3 ते 5 वाजेच्या दरम्यान पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील वडगाव, सवना, जिरोणा, एकघरी, पार्डी, टेभी, खडकी बा, हिमायतनगर, कार्ला पी, सिबदरा, आंदेगाव आदींसह तालुक्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला असून, सकाळी 8 वाजेपर्यंत 14.33 मिलीमीटर नोंद करण्यात आली असून, आजवर एकूण 842.31 तर 68.19 टक्के पाऊस झाला असल्याची माहिती महसूल विभागातून सांगण्यात आली. छाया - चपती ताडकुले ( नांदेड न्यूज लाईव्ह सेवा)
विजांच्या कडकडाटात झालेल्या जोरदार पावसाने नाले - बंधारे वाहू लागले
हिमायतनगर(प्रतिनिधी)शहरासह ग्रामीण भागात दि.22 रोजी सकाळी 3 ते 5 वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह झालेल्या दमदार पावसामुळे परिसरातील नाले व बंधारे खळवळून वाहू लागले आहेत. आजच्या पावसामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पंचमीनंतर चांगला मोठा पाऊस झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
यंदाच्या पावसाळ्यात वरून राजाने चांगला प्रतिसाद दिल्याने शेतीपिके जोमात आली आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने चांगलीच विश्रांती दिल्याने मूग, उडीदाचे उत्पादन घाटले आहे. मात्र गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थी पासून पावसाने दमदार सुरुवात केली आहे. दि. 20 मंगळवारी दुपारी सुद्धा हिमायतनगर तालुक्यात चांगला पाऊस झाला असून, 16 मिमी मीटर पावसाची नोंद झाली असून, आत्तापर्यंत (827.98) मीटर पाऊस झाला आहे. त्यानंतर दि.22 गुरुवारच्या मध्यरात्री 3 ते 5 वाजेच्या दरम्यान पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील वडगाव, सवना, जिरोणा, एकघरी, पार्डी, टेभी, खडकी बा, हिमायतनगर, कार्ला पी, सिबदरा, आंदेगाव आदींसह तालुक्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला असून, सकाळी 8 वाजेपर्यंत 14.33 मिलीमीटर नोंद करण्यात आली असून, आजवर एकूण 842.31 तर 68.19 टक्के पाऊस झाला असल्याची माहिती महसूल विभागातून सांगण्यात आली. त्यामुळे सखल भागात व चिबाडी रानात पाणी साचले असून, अनेक गावाकडे जाणाऱ्या पुलाची अवस्था बिकट झाल्याने तर काही पुलांची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे वडगाव, जिरोणा, टेभी, सिबदरा आदी गावातील रस्ते काही तास बंद पडले होते. एकूणच आजच्या पावसाने पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांच्या कपाशीसह अन्य पिकांना उभारी मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी बोलून दाखविल्या आहेत.