हिमायतनगरच्या सार्वजनिक वाचनालयाला आली अवकळा...

जुन्या ग्रामपंचायत इमारतीत स्थलांतर करावे
हिमायतनगर(प्रतिनिधी)जुन्या नगरपंचायतीच्या बाजूला असलेल्या नगरपंचायतीच्या वाचनालयाची अत्यंत बिकट अवस्था झाली असून, वाचनालयासाठी इमारत, फर्नीचर, खोलीवर टीन पत्रे नसल्यामुळे  1981 ला स्थापना झालेले हे वाचनालय आता शेवटच्या घटिका मोजत आहेत. या ठिकाणी तत्कालीन  ग्रामपंचयतीच्या इमारतीत सार्वजनिक वाचनालयाची सुरुवात करून वाचकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे.

तत्कालीन ग्रामपंचायतीने सुरु केलेल्या सार्वजनिक वाचनालयात विविध वर्तमानपञांसह येथे जवळपास  अंदाजीत 3999 एवढी
ग्रंथसंपदा आहे. येथील वाचनालयाला अवकळा आल्याने नित्यनेमाने वाचनासाठी येणाऱ्यां वाचकांची संख्या कमी होऊ लागली आहे. तरी वर्तमानपत्र व काही सुजान वाचक वाचनाचा छंद जोपण्यासाठीनियमितपणेवाचनालयात येत असतात. परंतू आज रोजी वाचनालयाची झालेली दुरावस्था पाहूनआरे........ रे..... रे असे शब्द अपसुकच वाचकांच्या तोंडुन निघत आहेत. सध्या स्थितीत वाचनालयात एक लाकड़ी टेबल, एक लाकड़ी खुर्ची, मोड़लेली व जिर्ण झालेली चार - पाच लाकडी बाकडे जुनी लाकड़ी कपाटे मोड़लेला दरवाजा टीनपत्रे व आधार म्हणून खाली लावलेले प्लाईवुड आशा अवस्थेत  वाचनालय वाचकांना वाचनाची सेवा पूरवत आहे. 

तत्कालीन ग्रामपंचायतीच्या काळात दुर्लक्षित झालेले हे वाचनालय नगरपंचायत अस्तित्वात आल्याने तरी  बाळसं धरेल अशी सामान्य वाचकांची व  ग्रंथपालाची अपेक्षा होती. परंतु नगरपंचायत अस्तित्वात येऊन जवळपास वर्षे होत असलेतरी रिकामी झालेली नगरपंचायतीची ईमारत वाचनालयाला देण्यासाठी  लोकप्रतिनि व अधिकाऱ्यांना मुहूर्त मिळाला नाही. येथील वाचनालय जुन्या नगरपंचायतीच्या इमारतीत स्थलांतरीत करावे यासाठी निवेदन देऊन वाचकांनी मागनी केली. परंतु लोकप्रतिनिधीनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप केला जात आहे. 1985 पासून येथे ग्रंथपालचे काम करनारे शाम मंडोजवार यांना दरमाहा केवळ 4000 पगार मिळतो. तोही वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्या  कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. नगर पंचायत प्रशासनाने याकड़े लक्ष्य देऊन वाचन संस्कृती वाढविन्यास मोलाचे योगदान देणाऱ्या वाचनालयाची अवस्था सुधारावि आशी मागणी सुज्ञ नागरिक व वाचकांतुन करण्यात येत आहे .

12 महीने पासुन पगार नाही - ग्रंथपाल मंडोजवार


आज वाचनालयास भेट दिली आसता खुर्चीवर बसून वर्तमान पत्राच्या घड्या घालत असलेले ग्रंथपाल श्यामभाऊ मंडोजवार हेवाचनालयाची लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाची करून कहानी कथन करताना सांगू लागले. सदरिल वाचनालयाची होत असलेली दुरावस्था सुधारण्यासाठी ग्रापंचायत अस्तित्वात असतांना लोकप्रतिनिधीनकडे अनेक वेळा मागनी केली. परंतु कोनीही याकडे लक्ष दिले नाही, त्यामुळे वाचनालय आजही " क  " दर्जाचेच आहे. गेल्या आकटोबर महीन्यापासून पगार मिकलली नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे ग्रंथपाल असून, उर्वरित वेळेत अन्य काम करून दिवस काढावे लागत असल्याचे मंडोजवार यानी सांगितल.

याबाबत नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, वाचनालयासह शहराच्या अन्य विकास कामासाठी मोठा निधी उपलब्ध झालेला आहे. परंतु मुख्याधिकारी यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने सर्व कामे ठप्प झाली आहेत. लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल असेही ते म्हणाले. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन बागुल यांच्याशी दूरधवनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी