हिमायतनगर (प्रतिनिधी) भारतीय परंपरेनुसार वर्षातून एक वेळा येणाऱ्या वृषभराजाचा पोळा दुष्काळाच्या गर्तेतही बळीराजाने उत्साहात साजरा केला आहे. हिमायतनगर नगरपंचायत झाल्यानंतर अधिकारी - पदाधिकारी मानाच्या बैलजोडीसह मारोती मंदिर परिसरात दाखल झाले. यावेळी हजारो शेतकरी आपल्या सर्जा - राज्याची जोडी घेऊन उपस्थित झाले होते. ठरलेल्या वेळेवर पुरोहित परमेश्वर बडवे यांच्या मधुर वाणीतील मंगलाष्ठाकात सायंकाळी 05 वाजून 01 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर येथील बाजार चौकात विवाह सोहळा संपन्न झाला.श्रावण मासातील अमावास्येच्या बुधवारी दि.31 रोजी पोळ्याच्या सन आला असून, यावर्षी अल्प पावसाने बळीराजा आर्थिक कोंडीत सापडला असताना देखील, दिवसरात्र घाम गाळणार्या वृषभ राजाचा सणाची साधीच का होईना तयारी केली होती. सकाळी ५ वाजताच शेतकर्यांनी पळसाच्या मेढ्या आणून लक्ष्मी मानल्या जाणर्या उकिरड्यावर, गावातील देवाला व घराच्या प्रवेश द्वाराच्या दॊन्हि बाजूने ठेऊन पूजन केले. हनुमंतरायाला शेंदुराचे लेप व झंडे लाऊन, पूजा - अर्चना करून नारळ व साखरेचा प्रसाद चढूउन पोळ्याची तयारी केली तर महिलांनी रामप्रहरी सडा - संमार्जन करून पानात वापरला जाणारा चुना व गेरूने शेती अवजारे व मेड्याची पूजा - अर्चना केली. लग्न मुहूर्तसाठी बैलाना अंघोळ घालून वार्निश, घुंगरमाळ, मोरके, कासरे, झुली, गोंडे, बेगडी, बाशिंग, नाडापुडी, नागेलीचे पान आदिने सजउन शेतकऱ्यांनी उत्सवाची तयारी केली. परमेश्वर मंदिर व नगरपंचायतीकडून लग्न मुहूर्ताची निश्चित वेळ सांगताच शेतकर्यांनी नवेवस्त्र परिधान करून आप -आपली बैल जोडी गावातील प्रमुख मंदिरांचे दर्शन घेऊन सायंकाळी ४ वाजता सामील झाले.
या दिवशी प्रथम बैलजोडीचा मान परंपरेनुसार नगरपंचायतीचा असल्याने येथील मुख्याधिकारी नितीन बागुल व नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद, अनिल पाटील व सर्व नगरसेवकांच्या हस्ते मानाच्या बैलांची पूजा करून ढोल - ताश्याच्या गजरात पोळ्याची मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणूक येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन शहरातील मुख्य रस्त्यावरून वाजत -गाजत पोलिस स्थानकाजवळील हनुमान मंदिराजवळ दाखल झाली. ढोल - ताश्याच्या गजरात वाजत गाजत, नाचत पोळ्याची निघालेली मिरवणूक शहरातील लहान - थोरांसाठी आकर्षण बनली होती. येथील दक्षिण मुखी मारोती मंदिराजवळ पोहोन्चताच पुरोहितांच्या मधुर वाणीतील मंगलाष्ठकात विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी पोळा मिरवणुकीत माजी.जी.प.सदस्य समद खान, नगरसेवक प्रभाकर अण्णा मुधोळकर, नगरसेविका सौ.पंचफुलाबाई लोणे, लक्ष्मीबाई भवरे, नगरसेवक रामभाऊ ठाकरे, कुणाल राठोड, विनायक मेंडके, म.जावेद अ. गन्नी, अ.गुफरान, ज्ञानेश्वर शिंदे, शे.रहीम पटेल, सरदार खान, अश्रफ भाई, अन्वर खान, आहद भाई, कृउबाचे सुभाष शिंदे, उदय देशपांडे, मंदिर समितीचे सेक्रेटरी, राजेश्वर चिंतावार, प्रकाश शिंदे, विठ्ठलराव वानखेडे, प्रकाश कोमावार, अनंता देवकते, नारायण बास्टेवाड, विठ्ठलराव चव्हाण, माधव पाळजकर, बाबुराव होनमने, हनुसिंह ठाकूर, श्याम ढगे, गोविंद बंडेवार, संजय माने, विजय नरवाडे, राम सूर्यवंशी, भारत डाके, पापा पार्डीकर यांच्यासह शहरातील प्रमुख मान्यवर, राजकीय नेते, तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, नागरिक, लहान थोर मंडळीनी उपस्थिती लावली होती. लग्नानंतर लगेच पोळ्याची रीघ सुसाट वेगाने धावत सुटली, ते आपल्याघरी जाईपर्यंत थांबली नाही, घरी जाताच वृषभ राजाची आरती, महापुजा करून पुरण पोळीचे नैवेद्य, बैलांच्या पायावर काकडी फोडून मजूरदार व निमंत्रीताना पुरण पोळीचे भोजन देण्यात आले. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक विठ्ठल चव्हाण यांनी चोख पोलिस बंदोबस्त लावला होता.
स्वच्छता व पर्यावरणाचा संदेश
तसेच तालुक्यातील, पळसपूर, सरसम, यासह अन्य ठिकाणी पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. त्यापैकी परोटी येथील तांड्यात शेतकऱ्यांनी पोळ्याचा सण साजरा केला. यावेळी तालूका आरोग्य विभागाच्या पुढाकारातून बैलाच्या अंगावर नोरीगी जीवनासाठी शौचालय, स्वच्छता, डासमुक्त अभियान, कुटुंबनियोजन, वृक्षारोपण, पर्यावरणाचा समतोल यासह विविध संदेश देणाऱ्या झुली टाकून सामाजिक संदेश दिला. तालुक्यातील टेभी गावासह ग्रामीण भागातील गावात गुरुवारी पोळा साजरा करण्यात आला.