वैकुंठधामच्या विकासासाठी समितीची निवड..

अध्यक्षपदी श्रीश्रीमाळ, उपाध्यक्ष पळशीकर, सेक्रेटरीपदी बंडेवार 

हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरातील बोरगडी रस्त्यावर असलेल्या हिंदू स्मशान भूमी " वैकुंठधाम " च्या विकास कामासाठी नुकतीच समितीची स्थापना करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी शांतीलाल श्रीश्रीमाळ, उपाध्यक्षपदी रमेश पळशीकर तर सेक्रेटरीपदी गोविंद बंडेवार यांची निवड करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून येथील स्मशान भूमी विकासापासून दूर आहे. येथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या हिंदू समाज बांधवाना
मोठया जिकरीचे सामना करत अंत्यविधी पार पढावा लागत आहे. तसेच स्मशान भूमीला सुरक्षा भिंत, अंत्यविधीस येणाऱ्या महिला - पुरुषांना बसण्यासाठी आसन, पावसाळ्यात पावसापासून व उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण मिळत नसल्याने याचा परिस्थितीत अंत्यविधी उरकेपर्यंत तात्काळावे लागत होते. यासाठी अनेकदा तत्कालीन आमदार, खासदार यांच्याकडे निधीची मागणी करूनही निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे या ठिकाणी अंत्यविधी कार्यक्रम गैरसोयीचा सामना करत उरकावे लागत आहे. हि गैरसोय दूर व्हावी आणि अंत्यविधीच्या कार्यक्रम सोईस्कर व्हावा याउद्देशाने शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींनी एकत्र येऊन एक समिती स्थापित केली आहे. दि.23 मंगळवारी शहरातील रुख्मिणीनगर येथील व्यापारी गोविंद बंडेवार यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी शांतीलाल श्रीश्रीमाळ, उपाध्यक्षपदी रमेश पळशीकर, सेक्रेटरीपदी गोविंद बंडेवार, सहसेक्रेटरीपदी मनोज मद्रेवार, सदस्य म्हणून प्रभाकर मुधोळकर, जयराम मादसवार, विष्णू रामदिनवार, दीपक बास्टेवाड, संतोष गाजेवार, डॉ. प्रसाद डोंगरगावकर, कांताराव वाळके, राजकुमार पिंचा, हनुसिंग ठाकूर, दत्तात्रेय तीम्मापुरे, अमोल कोटुरवार, संतोष नरवाडे, अनिल मादसवार, शिवाजी भंडारे, साहेबराव चव्हाण, राजू तुप्तेवार, संजय पेन्शनवार, सतीश मामीडवार, बाळूअण्णा चवरे, प्रवीण जन्नावार, मिलिंद जन्नावार, भास्कर चिंतावार, गजानन मुत्तलवाड, नारायण गुंडेवार, यांच्यासह अनेकांचा समितीत समावेश आहे. दरम्यान बुधवारी समितीच्या पधाधिकाऱ्यानी माजी आ. माधवरावजी जवळगांवकर, नगराध्यक्ष अ अखिल साहेब यांची भेट घेऊन चर्चा केली. दोघांनीही समितीला सर्वोतपरे सहकार्य करण्याचे आणि जास्तीत जास्त निधि उपलब्ध करुण देण्याचे आश्वासन दिले .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी