राष्ट्रीय ग्रामीण अभियान कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

नांदेड(प्रतिनिधी)जिल्हाभरात राष्ट्रीय ग्रामीण अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या 18 हजार कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम समायोजन करण्यात यावे. यासह अन्य मागण्यासाठी दि.24 ते 31 ऑगस्टपर्यंत काळ्या फिती लावून आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात सॅन 2005 साली केंद्र सरकारने करून अंमलबजावणीसाठी राज्य,
जिल्हा, तालुका प्राथमिक आरोग्य व उपकेंद्रस्तरावर डी.पी.एम., डेम, एम ऑन्डर्ड, को ऑडीनेटर ( अशा, आय.पी.एच.एस.सिकलसेल, स्कुल, हेल्थ) कार्यक्रम सहाय्यक अभियानात वैद्यकीय अधिकारी आर.बी.एस.के.जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय लेखापाल, कार्यक्रम सहाय्यक, समूह संघटक, सिकलसेल, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ए.एन.एम., जी.एन.एम., एल.एच.व्ही., गट प्रवर्तक, औषध निर्माण अधिकारी, कुष्ठरोग तंत्रज्ञ, क्षयरोग तंत्रज्ञ, आर.के.एस. के. समन्वयक, कंत्राटी पद्धतीने मुलाखत घेऊन अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. देशात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंमलबजावणीमुळे सुधारणा झाली. आणि वरील अधिकारी व कर्मचारयांच्या  प्रयत्नाने महाराष्ट्र्र शासनाला अनेक पुरस्कार मिळाले. परंतु यात काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या वेतन व असुविधेत राहावे लागत आहे. त्यामुळे एक प्रकारचा अन्याय होत असून, 31 मार्च  2017 ला या अभियानाचे सहसंचालक संजीव जाधव यांचा कालावधी संपुष्टात येत असल्याने एनएचएम  कर्मचाऱयांना 31 मार्च पर्यंतच पुनर्नियुक्त देण्याचे वरिष्ठांनी पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे 18 हजार कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ येणार असून, त्यांचे आयुष्य अंधकारमय होण्यात आहे. हा एक प्रकारचा  अन्याय असून, शासनाने तात्काळ आदेश स्थगित करून सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय शेवत कायम  समाविष्ट करावे या मागणीसाठी दि.24 ते 31 ऑगस्ट परायणात काळ्या फिती लावून कार्यालयात काम करण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदार याना देण्यात आले आहे. यावेळी तालुक्यातील कर्मचारी अफरोज सौदागर, उपाध्यक्ष कृष्णा चौधरी, सहसचिव सुनील चव्हाण, श्री भोसले, डॉ. मामीडवार मैडम, डॉ. कदम, डॉ. गुंडाळे, श्रीमती तुंगेवाड, येनगुलवार, वाळके, वागतकर, गवळे, कांबळे, शेवाळकर, रसलवार, मीरेवाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.       

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी