जप्तीपोटी आठ मालमत्ताधारकांवर कार्यवाही करताच 20 लाख 66 हजार 490 ची वसुली

नविन नांदेड(रमेश ठाकूर)नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रिय कार्यालय क्र.ड(सिडको) अंतर्गत नियुक्त केलेल्या जप्ती पथकाने मालमत्ताधारकांकडे असलेलया थकबाकी मालमत्ता करापोटी जप्तीची कार्यवाही करण्यासाठी गेले असता आठ जनाविरुध्द कार्यवाही केली असता धनादेशासह एकूण रु.2066490/- वसुली पथकाने केली आहे. 

घर क्र.10-2-339 या मालमत्ताधारकाकडे थकबाकी रु.34105/- होती, दुकान सिल करते वेळेस संबंधतानी
नगदी रु.20,000/-भरणा केला आहे. तर घर क्र.10-2-267 या मालमत्ता धारकाकडे थकबाकी रु.31568/- होती, दुकान सिल करते वेळेस संबंधतानी नगदी रु.10,000/-भरणा केला आहे. कौठा परिसर घर क्र.10-2-268 मालमत्ता धारकाकडे थकबाकी रु.50415/- होती, संबंधतानी रु.50415/- चा धनादेश, कौठा परिसर घर क्र.10-2-489/1 या मालमत्ताधारकाकडे थकबाकी रु.51236/- होती, नगदी रु.51236/-भरणा केला आहे. कौठा परिसर घर क्र.10-2-496/2 या मालमत्ताधारकाकडे थकबाकी रु.111845/- होती संबंधतानी नगदी रु.111845/-भरणा केला आहे. वसरणी परिसर घर क्र.11-1-919 या मालमत्ताधारकाकडे थकबाकी रु.85647/- होती त्यांनी नगदी रु.85647/- तर सिडको परिसर A120 घर क्र.11-4-166 या मालमत्ताधारकाकडे थकबाकी रु.26881/- होती संबंधतानी नगदी रु.26881/-भरणा केला आहे. सिडको परिसर A120 घर क्र.11-4-166 या मालमत्ताधारकाकडे थकबाकी रु.27203/- होती, दुकान सिल करते वेळेस संबंधतानी नगदी रु. 27203/-भरणा केला असून या वेळी जप्ती पथकाने संबंधिताचे शौचालयाची जोडणी बंद करत असतांना त्यांनी वरील रक्कमेचा भरणा केला. अशा प्रकारची कार्यवाही करीत जप्ती पथकाने धनादेशद्वारे रु.93006/-व नगदी रु.19,73,484/-अशी एकूण रक्कम रु.20,66,490/- क्षेत्रिय कार्यालय क्र.ड(सिडको) अंतर्गत मालमत्ता कराची वसुली केलेली आहे.

सदरील जप्तीची कार्यवाही मा.आयुक्त, मा.उपआयुक्त(महसूल/विकास) यांच्या मार्गदर्शनलाखाली चालू राहणार आहे. व ही जप्तीची मोहीम चालू राहणार असल्याचे सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांनी सांगितले. ही जप्तीची मोहीम राबविण्यासाठी सहाय्यक आयुक्त संजय जाधव, कर निरीक्षक बी.एस.चामे, अ.जब्बार, अ.हबीब, हिराचंद भुरेवार, व वसुलीलिपीक दिपक पाटील, वामन पारेकर, संजय गिते, दत्ता पानपट्टे, संजय भालेराव, ड्रेनेज व पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी कार्यरत होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी