किनवट(प्रतिनिधी)श्रावण मासात रुद्रपुजा करुन सहा शक्ती देवतांना आव्हानाद्वारे दोषमुक्त करण्यासाठी, गावाला सुख सम्रुध्द करण्यासाठी, मानवी जिवनातील दुखः निवारण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रुद्र पुजेत सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहण “वसुदैव कुटुंबक” या सुत्रावर काम करणारे अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हींग या संस्थेच्या किनवट शाखेने केले आहे.
दिनांक २६ ऑगस्ट रोजी शहरातील साई वंदना मंगल कार्यालयात सकाळी ९ वा. श्रावण रुद्र पुजा संपन्न होत आहे या बाबत माहीती देतांना आयोजक स्वाती नेम्मानिवार व संध्या दासरवार यांनी सांगितले कि , श्रावण रुद्र पुजेचे महात्मे आधीकाळी होते, पुर्वी हृषीमुनी , ब्राम्हण गावा गावात जाऊन श्रावण रुद्रपुजा करीत असत यामुळे साथीचे रोग नष्ट होत असत त्या सोबतच या रुद्र पुजेमुळे चार दोष मुक्त होतात १) वास्तुदोष २) ग्रहदोष ३) पितृदोष ४) कर्मदोष हे दोष नष्ट होऊन नकारात्मक दृष्टीकोण नष्ट होऊन सकारात्मक उर्जा प्राप्त होते यासाठी आरंभी शिवशक्ती , आदीशक्ती पार्वती , नारायण , महालक्ष्मी , गणपती, व गुरु याचार तत्वाला आवाहन करुन श्रावणरुद्र पुजा संपन्न होते , मंत्रोपचारामुळे उर्जा प्राप्त होऊन गावात नवचैतन्य निर्माण होते.
“सर्वे भवंतु सुखीमया, सर्वे संतु निरामया” हे सुत्र घेऊन जनकल्यानासाठी गावाच्या वृध्दीविकासाठी आधिकाळी श्रावण रुद्र पुजा केली जात असे मध्यंतरी यामध्ये खंड आलाहोता मात्र आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेतुन जनहितार्थ आर्ट ऑफ लिव्हींग ने किनवट येथे रुद्र पुजेचे आयोजन केले आहे याचा लाभ शहरातील व परीसरातील नागरीकांनी घ्यावा असे आवाहन आयोजक व शिष्य स्वाती नेम्मानिवार, संध्या दासरवार, अनिता सराफ, प्रमिला कंचर्लावार, विश्वास सुंकरवार, डॉ.अभिक्त ओव्हळ, राजकिरण नेम्मानिवार, व्यंकटेश कंचर्लावार, सुनिल पाटील, संजय सिरमनवार, संतोष ताडपेलीवार, देवराव कोमरवार, कचरु जोशी यांनी केले आहे.