रेल्वे बैठक संपन्न

विभागीय सल्लागार समितीची १५ वी बैठक संपन्न

नांदेड(प्रतिनिधी)नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. ए.के. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय रेल्वे सल्लागार समितीची १५ वी बैठक आज संपन्न झाली. या बैठकीस नांदेड विभागातून विविध ठिकाणाहून १५ सदस्य उपस्थित झाले होते. बैठकीच्या सुरुवातीला सदस्य श्री ओमप्रकाश मोर, वाशीम यांच्या दुखद निधानाबद्दल सर्वांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी श्री मधुसुधन, वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक, नांदेड यांनी नांदेड विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या विविध कार्याची माहिती दिली, ज्यात विविध स्थानकावर ३५ ए.टी.व्ही.एम. लावणे, लिफ्ट बसवणे, सरकते जिने लावणे, प्लातफोर्म वर वाशेबल अप्रोन बनविणे, चालत्या गाड्यात सफाई करण्यासाठी कंत्राट देणे, कोच इंडीकेशन बोर्ड बसविणे, ट्रेन इंडीकेशन बोर्ड बसविणे, विशेष गाड्या चालविणे, अतिरिक्त डब्बे जोडणे, आदी. रेल्वे प्रवाश्यांकारिता करत असलेल्या विविध कार्याचे सल्लागार समितीने कौतुक केले. विशेष करून डॉ. सिन्हा, डी.आर.एम. हे ज्या प्रकारे प्रवाश्यांचे तक्रारीचे तत्काळ निवारण करतात त्या विषयी सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच सिंगल लाईन रेल्वे पटरी असतांनाही रेल्वेने गेल्या वर्ष भारत ९८% गाड्या वेळेवर चालविल्या बद्दलही त्यांचे अभिनंदन केले.

सल्लागार समिती सदस्यांनी विविध स्थानकावर असलेल्या समस्यांचे समाधान करण्या करिता मागणी केली. मुंबई करिता नवीन रेल्वे सुरु करणे, पुणे रेल्वे नियमित करणे, तपोवन, नंदीग्राम, एक्स्प्रेस मध्ये डब्बे वाढविणे आदी मागण्या मांडल्या. डॉ. सिन्हा यांनी कळविले कि पुणे एक्स्प्रेस लवकरच आठवड्यातून सहा दिवस होणार आहे तसेच मुंबई करीत नवीन गाडी सुरु करण्यासाठी नांदेड विभाग दर वर्षी मुख्यालय कडे प्रस्ताव पाठवत आहे. पुढील निर्णय मुख्यालय तसेच रेल्वे बोर्ड घेईल असेही सांगितले. यावेळी डॉ. सिन्हा यांनी सर्व सदस्यांना विनंती केली कि त्यांनी वृक्ष रोपनात रेल्वेला सहकार्य करावे. आप आपल्या परिसरातील रेल्वे स्थानकावर विविध रोपे लावावीत. नांदेड रेल्वे विभाग या वर्षी सहा लाख झाडे लावणार असल्याचेही त्यांनी या वेळी कळविले. तसेच डॉ. सिन्हा यांनी सर्व सदस्यांना माल वाहतुकी करिता रेल्वेचा वापर करण्याची विनंती केली. स्थानकावर आणि रेल्वे गाड्या मध्ये साफ-सफाई ठेवण्याचे, तिकीट घेवूनच प्रवास करण्याचे सर्व जनतेश सदस्या मार्फत आवाहन केले. या बैठकीस १५ सदस्य उपस्थित होते. ज्यातश्री शंतनू डोईफोडे, श्री थानसिंग बुंगाई, श्री जुगलकिशोर कोठारी, श्री गोविंद जाधव, श्री अनिल पाटील, श्री सुधाकर खराटे, श्री सयेद अयुब, श्री मंगेश कापोते, श्री भावेश पटेल, श्री नंदकिशोर तोष्णीवाल, श्री गुरुमुख सिग गुलाठी, श्री एस.एस. ठाकूर, श्री शरणु कादंगाची, श्री उमाकांत पापिनवार, श्री अविनाश अग्रवाल यांचा समावेश आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी