विषारी नागराजाचे दर्शन

कोब्रा नागराजाने तब्बल चार तास दिले दर्शन
हिमायतनगर (प्रतिनिधी) शहरात दि. 09 मंगळवारी आलेल्या श्रीयाळ सणाच्या दिवशी सकाळी 6 वाजता प्रगट झालेल्या कोब्रा जातीच्या विषारी नागराजाने महिला -पुरुष भक्तांना तब्बल चार तास दर्शन दिले आहे.

रविवारी नागपंचमीचा सन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळवारी ग्रामीण भागात श्रीयाळराजाचा सन उत्साहात साजरा करण्याच्या तयारीत महिला असताना शहरातील बजरंग चौकातील एका नागरिकांच्या घरी विषारी कोब्रा जातीचे 4 फूट लांबीचा नागराज दिसून आले. फणा काडून उभा असलेल्या घरातील नागराजाच्या पाहण्यासाठी गर्दी झाली. आवाजामुळे नागराजाने आपले स्थान सोडून चक्क नाल्याच्या पाण्यात बस्तान मांडले. दरम्यान या ठिकाणी दोन मुंगासासोबत नागाची चांगलीच लढाई चालली. या दोघांचे युद्ध रंगल्याचे चित्र अनेकांनी तासभर पहिले, दरम्यान कोब्रा हारत नसल्याचे पाहून आणि झालेल्या माणसांच्या गर्दीच्या आवाजाने मुंगसाने पळ काढला. परंतु कोब्रा नागराजाचे कुठेही न हलता जखमी अवस्थेत तब्बल चार तास फणा काडून दर्शन दिले. यावेळी शेकडोहून अधिक महिला -पुरुष नागरिक, युवक व बालकांनी गर्दी केली होती. जखमी झालेल्या नागराजास पकडून दूर सॊडण्यासाठी सर्पमित्र दत्ता ढवळे व त्यांच्या सहकारी मित्रांनी प्रयत्न केले, परंतु मुंगसाच्या युद्धाने गंगावलेल्या व कातीवर आलेल्या नागराजाच्या फुफ्काराने पकडणे शक्य झाले नाही.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी