NEWS FLASH १) पाण्यात बुडाल्याने तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू,.....२) स्वस्त धान्य दुकानदार अपंगांची फसवणूक करीत आहे,......३) खतांचा पुरवठा त्वरित करा, अन्यथा भाजपच्या वतीने जनआंदोलन - संदीप केंद्रे,.....४) राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के दरवर्षी प्रमाणे मुलींची बाजी,...५) 1 लाख 72 हजारांच्या दागिन्यांसह चोरटा स्थागुशाने पकडला,.....६) लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणार्‍यावर गुन्हा दाखल,.....७) कॉन्वेजीनियसचा १०० दशलक्ष विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पुढाकार,.....८) कोरोना बाधितांचा मृत्यूदर रोखण्यासाठी घरनिहाय सर्वेक्षणावर भर - डॉ. विपीन,....९) कोरोना विषाणूने दीड शतकाजवळ दिले नवीन रुग्ण, आज १३४ बाधीत रुग्ण; नांदेड शहरात ४६; ग्रामीण भागात ८८,.....१०) साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, ..., **

शनिवार, 26 दिसंबर 2015

हिमायतनगर परिसरात नंदीवाल्याचे आगमन

गळ्यात बघा घुंगरु गुबु-गुबु वाजतोय... मालकाच्या इश्यार्‍यावर नंदी कसा वागतोय !

नांदेड(अनिल मादसवार)कडाक्याच्या थंडीत सकाळच्या प्रहरी नंदीबैलवाल्यांचे जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात आगमन झाले असून, कोवळ्या उन्हाची उब आणि नंदीचे घुंगरू व ढोलकीची गुबुगुबू आवाजाने अनेकांना महाराष्ट्राच्या सामाजिक संस्कृतीच्या परंपरेचे दर्शन घडून येत आहे. 

थोर साधुसंताची भुमी असलेल्या महाराष्ट्राला स्वतहाची अशी सांस्कृतीक आणि वैभवशाली परंपरा आहे. या परंपरांची जपवणुक आजच्या धका-धकीच्या जिवनात देखील प्रत्येक महाराष्ट्रीयन मराठी माणुस आप-आपल्या परिने करतांना दिसतोय. अनेक सन-उत्सव, यात्रा महोत्सव आणि पारंपारीक कार्यक्रम आजही महाराष्ट्रामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी होतात. कितीही वैज्ञानीक प्रगती मानसांनी केली तरी पारंपारीक कार्यक्रमातील रस व माधुर्य आजही कायम आहे. वासुदेव, गोंधळी, संबळ वादक, अदिवासी नृत्य, बंजारा नृत्य, लेझीम, वाघ्या मुरळी, सनई वादन, आदिंसह नंदिवाल्यांची फेरी हे सर्व महाराष्ट्राच्या संस्कृतीक परंपरेचे दर्शन घडवीतात. आज काहीप्रमाणात या कलांचा लोकांना विसर पडु पहात आहे. परंतु जर असा कार्यक्रम कुठे रस्त्यावर किंवा चौकात असेल तर त्या टिकाणी अबाल वृध्दासह तरुण युवक नौकरदार सगळेच थांबतात आणि कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतात. 

असाच एक प्रसंग दि. २६ शनिवारी सकाळी 8 वाजता हिमायतनगर शहरातील प्रभाग क्रमांक ०१ मधील वरद विनायक तथा शनि मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर दिसून आला आहे. गेल्या काही दिवसापासून पडू लागलेल्या कडाक्याच्या थंडीने सर्वच अबल वृद्ध हे कोवळ्या उन्हाची उब मिळविण्यासाठी बसले होते. अचानक घुंगराचा आवाज ऐकू आला. वळून पाहताच काय बर्याच वर्षानंतर यवतमाळ जिल्ह्यातील गोकुळनगर ता.वणी येथून तालुक्यातुन आलेले गुरव समाज बांधव आणि मारोती नावाच्या नंदिबैलासह ढोलकीवर गुबुगुबू वाजवत येत होता. या आवजाने शेकडो बालके, अबाल वृद्ध, मुले - मुली व कामाला जाणार्यांना आपल्याकडे आकर्षित केले. कडाक्याच्या थंडीत कोवळ्या उन्हाची उब त्यात ढोलकीचा गुबु-गुबु असा आवाज आणि नंदीबैलांचा आकर्षक पेहराव घुंगरुंची रुणझुण ढोलकीची ढुमढुम एैकुन प्रत्येक जन कुतुहलाने गोलाकार थांबले. आणि जोशी बुवांनी आपला कार्यक्रम सुरु केला. पावने चार क्विटंल वजन असलेल्या नंदिचे चारीपाय स्वतहाच्या मांडीवर ठेवने, तोंडात माण घालणे, मांडीवर लंगडी खेळणे, पोटावर पाय देणे, चष्म्यावाल्याचे, टोपीवाल्यांचे, म्हातार्‍याचे, टक्कल पडलेल्याचे, नवविवाहीताचे, व्याहयाचे नाव ओळकणे, दोन पाय मांडीवर ठेऊन नाचने, दोन पाय जमिनीवर एक पाय मांडीवर एक पाय खांद्यावर ठेवणे, चित्रपटाती गान्यातील ठेक्यावर नाचने, दारु पिणारा ओळखणे, सखुबाईला, सदाशिव, मिनाताईला, मिशावाला, बिनमिशावाला, ल्गानापुर्वी बायकोला स्वप्नात पाहणार्यासह मोना मॅडमला ओळखणे हे आणि ईतर अनेक मनोरंजनाचे व तोंडात बोट घालायला लावणारे आश्चर्यजनक खेळ नंदिवाल्याच्या या नंदिनीं गावातील चौका - चौकात केले. या नंदिचे वय वर्ष ३ असल्याचे सांगून चंद्रपूरच्या महाकालीचा सोडलेला असल्याचे नंदिचे मालक संदीप गजर यांनी नांदेड न्युज लाईव्हशी वार्तालाप करतांना सांगीतले. 

संपुर्ण महाराष्ट्र, विदर्भासह गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगाना, आंध्रप्रदेश कर्नाटक, इत्यादी प्रांतत देखील ते आपले कला आणि गुण दाखवत असतात. त्यांच्या आजोबा - पंजोबापासुन परंपरेने त्यांनी हा रिवाज स्विकारला असुन, मुक्या प्राण्याला ऐवढ शिकवीणारे आम्ही मात्र शासनाकडुन उपेक्षीत असुन, शासनाकडुन कसलीच मदत किंवा आमच्या मुला बाळांसाठी शिक्षण किंवा इतर कोनत्याही गोष्टी मिळत नसल्याची खंत संदीप ताराचंद गजर वय २७ वर्ष यांनी व्यक्त केली. गावोगावी भटकंती करत फिरणारा हा समाज खरचं महाराष्ट्राच्या सांस्कृतीक परंपरेला जोपासणारा एकमेय अव्दीतीय समाज आहे. शासनाने त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे. 

रविवार, 20 दिसंबर 2015

आजी- माजी आमदारांची प्रतिष्ठा पनाला

काँग्रेस - सेनेच्या तिकीट वाटपावरून कही ख़ुशी - कहीं गम 

हिमायतनगर(अनिल मादसवार)नगर पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेस व शिवसेनेत तिकीट वाटपावरून अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याच्या भावनेने तर काही उमेदवारी पदरात पडून घेण्यात यशस्वी झाल्याने कार्यकर्त्यामध्ये कहीं ख़ुशी कहीं गम असे चित्र चौकाचौकात सुरु असलेल्या चर्चेवरून दिसून येत आहे.

हिमायतनगर नगर पंचायतीत शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारामध्ये सरळ लढत होणार असून, दोन्ही पक्षांच्या निष्ठावंत कर्त्यांनी पक्षाची उमेदवारी मिळेल या आशेने उमेदवारी दाखल केली होती. परंतु उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक घडलेल्या राजकीय घडामोडीवरून पक्षाची उमेदवारी मिळो अथवा न मिळो याची अशा न बाळगता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याचा फटका अधिकृत उमेदवाराला सहन करावा लागण्याची शक्यता दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाने वार्डातील इच्छुक उमेदवारांना डावलून दुसर्या वार्डातील उमेदवार लादल्याने संबंधित प्रभागातील इच्छुक उमेदवारावर अन्याय झाल्याच्या भावनेने संतप्त कार्यकर्ते सुडाची भाषा वापरात आहेत. तर शिवसेनेने निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून उपर्यांना संधी दिल्याने शिवसैनिकांची गुपचिळी काय चित्र निर्माण करणार हे आगामी काळात दिसणार आहे.  

पक्षांची अधिकृत उमेदवारी मिळविण्यासाठी " फिल्डिंग " लावणाऱ्या कार्यकर्त्यांना ऐनवेळी डावलल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी स्थानिक पक्ष नेतृत्वाला " कस " लावावा लागणार आहे. अनेकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची तर्ख २८ डिसेंबर असल्याने त्या नंतर दोन्ही पक्षांच्या लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.  

अमर राजुकारांची घोषणा ठरली वल्गना
-----------------------------------
विधानपरिषद सदस्य अमर राजूरकर यांनी नुकत्याच इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेवून हिमायातनगर येथे दुसर्या वार्डातील उमेदवार लादणार नाही. असे ठोस आश्वासन देत इच्छुकांना संधी देणार असल्याची घोषणा केली होती. परंतु अनेक प्रभागामध्ये त्याच वार्डातील निष्ठावंत इच्छुक उमेदवारांना डावलून दुसर्या वार्डातील उमेदवार आयात करून उमेदवारी दिल्याने अमर राजूरकर यांची घोषणा वल्गना ठरली आहे. त्यामुळे नाराज झालेल्यांचा फटका कॉंग्रेस पक्षाला व विधान परिषदेचे सदस्यपद मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या राजूर करांना घातक ठरणार आहे. 

पाणी पुरवठा योजना पाण्यात घालणाऱ्यास शिवसेनेची उमेदवारी 
-----------------------------------
हिमायतनगर शहराची २.१८ लाख ६६ हजारची पाणी पुरवठा योजनेच्या सुरुवातीलाच ६ लाखाचा अपहार करणाऱ्या तत्कालीन अंगठे बहाद्दर महिला सचिवास शिवसेनेने उमेदवारी बहाल केली आहे. यामुळे शहरातील नागरिकही सदरील उमेदवारास पाण्यात पाहत असून, या उमेदवारामुळे शिवसेनेलाही याचा दगाफटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

रविवार, 13 दिसंबर 2015

बिबट्याने केली वासराची शिकार

टाकराळा परिसरात बिबट्याने केली वासराची शिकार...परिसरात भीतीचे वातावरण


नांदेड(अनिल मादसवार) हिमायतनगर तालुक्यातील मौजे टाकराळा शिवारात बिबट्याने एका वासराची शिकार केल्याची घटना दि.१२ च्या मध्यरात्रीला घडली आहे. या घटनेमुळे शेतकरी व गावकर्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकर्याने जागलीवर जाने सोडले आहे. 

याबाबत सविस्तर असे कि, नांदेड - किनवट रस्त्यावर असलेल्या तालुक्यातील मौजे टाकराळा गाव हे तेलंगाना - मराठवाड्याच्या जंगलाच्या पायथ्याशी वसलेले आहे. यावर्षी अल्प पावसामुळे जंगलातील झाडांची पांगली होऊन जंगल भकास होत असून, पाणवठे आटल्याने जंगलात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यामुळे तहानलेले वन्य प्राणी मानवी वस्तीकडे किंवा शेती आखाड्यावर पाण्याच्या शोधात भटकत आहेत. अशीच भटकंती करणारा एका बिबट्या टाकराळा येथील शेतकरी बालाजी किशनराव शिंदे यांच्या शेतावळ असलेल्या तलावावर पाणी पिण्यासाठी दि.१२ डिसेंबरच्या रात्रीला आला. तहान भागवून भक्षाच्या शोधात मध्यरात्री शिंदे यांच्या आखाड्यावरील २ ते २.५ वर्ष वय असलेल्या वासरावर हल्ला करून शिकार केली. हा प्रकार शेतकरी सकाळी शेतात आला असता निदर्शनास आला, त्यांनी सदरील घटनेची माहिती पोटा बु.परिसरातील वनपाल श्री पवार, वनमजूर गारोळे व पशु वैद्यकीय अधिकारी यांना दिली. तातडीने सदर अधिकार्यांनी घटनास्थळावर येउन पंचनामा केला आहे. परंतु या गंभीर घटनेकडे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री तुकाराम पांडे फिरकले नसल्याने त्यांच्या कार्य तत्परतेवर शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

पळसपूर शिवारातील हरणाच्या मृत्यूचे गूढ कायम 
.............................. 
नुकतेच पळसपूर शिवारात मध्यरात्री भरधाव वेगात धावणाऱ्या एका हरणाचा मृत्यू झाला. या घटनेचा पंचनामा वनविभागाने केला असला तरी अद्याप सदरचे हरीण कश्यामुळे मृत झाले हे समजू शकले नाही. त्यामुळे वनविभागाच्या कार्यपद्धती संशयाच्या भोवर्यात अडकली आहे. या प्रकाराकडे उपवनसंरक्षक यांनी लक्ष देण्याची मागणी वन्यप्रेमी नागरीकातून केली जात आहे.

गुरुवार, 10 दिसंबर 2015

हिमायतनगरच्या ८ जणांना सुवर्णपदक

राज्यस्तरीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धेत 
हिमायतनगरच्या ८ जणांना सुवर्णपदक 


हिमायतनगर(खास प्रतिनिधी)नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धेत हिमायतनगर येथील हुजपा व राजा भगीरथ विद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळविले असून, पाच जनन रौप्य तर पाच जननी कस्य पदक जिंकून हिमायतनगर शहराचे नाव उज्वल केले आहे. या यशस्वी मुला -मुलींचे संस्था व क्रीडा प्रेमी नागरीकातून अभिनंदन केले जात आहे. 

पुणे येथील माळवाडी, हरडपसर परिसरातील एस.एम.जोशी महाविद्यालयाच्या प्रांगणात दि.०४ ते ०६ डिसेंबर दरम्यान झाल्या. याचे उद्घाटन आ.राणा जगजीतसिंह पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकरण पण्णीकर, मा.सौ. निताताई होले यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा उद्घाटन होऊन संपन्न झाल्या. यावेळी श्री चेतन तुपे पाटील, मगेश तुपे पाटील, प्राचार्य डॉ.अरविद बुरूगुले, सुनिल दादा बनकर, डॉ.शंतनु जगदाळे, ईम्तीयाज भाई मोमिन, प्रशात दादा जगताप, ज्योती यादव, मा.सागर तुपे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या स्पर्धांचे आयोजन क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट राज्य व बुडो फेडरेशन इंडिया / वर्ल्ड बुडो फेडरेशन / इंटरनेशनल ऑलंपिक कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना दि.06 डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता बक्षीस(ट्रॉफी) मा.आ.जग्गन्नाथ बापू शेवाले, राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकरण पण्णीकर, चेतन पाटील, महाराष्ट्र् केसरी दत्ता गायकवाड, अध्यक्ष शाम भाेसले, सचिव लहू पारवे, राष्ट्रीय सदस्य भानुदास शिंदे आणि सर्व मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक यजमान पुणे यांनी पटकवला तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठाणे जिल्हा ठरले तर तृतीय क्रमांक नांदेड जिल्ह्याला मिळाला आहे. नांदेड जिल्ह्यातून हिमायतनगर तालुक्याचे एकूण २० विद्यार्थी विद्यार्थीनिनी सहभाग घेतला होता. 


यातून 1) कु.सोनी दत्ता शिल्लेवाड, 2) कु.मनिषा दिगांबर करेवाड, 3) कु.शुभांगी राजकुमार गाजेवार, 4) कु. नांलदा धर्मपाल पाटील, 5) कु.आज्ञा ज्ञाणोबा पंदलवाड, 6) विशाल प्रकाश दगडे, 7) ओंकार बालाजी कदम, 8) संदेश रामराव नरवाडे या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. तर 1) तुषार सुदर्शन भवरे 2) अभिषेक विद्दासागर पोपलवार, 3) कु.आचल अच्युतराव वायफनकर, 4) अनिल सुभाष रोकडे, 5) सुबोध सुभाष वाठोरे या विद्यार्थ्यांनी रौप्यपदक जिंकले आहे. आणि 1) कु. साक्षी धनराज ईरपाची, 2) कु. कांचन रामजी तिमापूरे, 3) कु. अंजली विठ्ठल कदम, 4) ऋषभ शेषेराव मिराशे, 5) संकेत संतोष जंगम या विद्यार्थ्यांनी कास्यपदक मिळविले आहे. 1) कु. रागिनी धनराज ईरपाची, 2) शिवकुमार प्रभाकर नेवल या विद्यार्थ्यांना पदक मिळाले नसले तरी त्यांनी आपल्या वजन गटात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना मुख्य प्रशिक्षक खंडू एम.चव्हाण व प्रशिक्षक रामा गाडेकर, महिला कोच शुभांगी गाजेवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे नांदेडचे सेन्साई सुशीलकुमार चव्हाण, परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, प्रभाकर मुधोळकर, शेवडकर सर, प्रा.माने सर, डाके सर, सुवर्णकार सर, गुंडेवार सर, कुलकर्णी सर, रेड्डी मैडम, गाजेवार सर, वायफनकर सर, पाटील सर, देशपांडे सर, कागणे सर, डॉ. चव्हाण मैडम, डॉ. कदम, गजानन चायल यांच्यासह सर्व पत्रकार व जिम्नैस्टिक असोशियांच्या सर्व पदाधिकार्यांनी अभिनंदन केले आहे.  

शिजविलेल्या अन्नात आळया निघाल्याने एकच खळबळ

आदिवासी वस्तीग्रहातील विद्यार्थांना शिक्षणसाठी भोगाव्या लागतात नरक यातना


नांदेड(अनिल मादसवार)जिल्ह्यातील हिमायतनगर येथील बोरगडी रस्त्यावर असलेल्या शासकीय आदिवासी मुलांच्या वस्तीग्रहात सकाळच्या जेवणासाठी बनविलेल्या अन्नामध्ये आळया निघाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यापासून शिक्षणासाठी नरक यातना भोगाव्या लागत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी पत्रकारासमक्ष दिल्याने अधीक्षक व भोजन व्यवस्थापकाच्या दुर्लक्षित कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवटच्या अंतर्गत हिमायतनगर शहरात आदिवासी मुलाचे वस्तीग्रह हे भाड्याच्या इमारतीत चालविले जात आहे. सदर वस्तीग्रहात १२२ विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी किनवट तालुक्यातील माळबोरगाव येथील स्व.पंचफुलाबाई शिक्षण प्रसारक मंडळाला कंत्राटी तत्वावर प्रशासनाच्या अटी व शर्तीनुसार ठेका देण्यात आला आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून येथील निवासी विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तसेच वस्तीग्रह परिसर घाणीने व्यापला असून, झोपण्यासाठी तुटलेले पलंग, बंद पंखे आणि दार तुटलेल्या बाथरूममुळे विद्यार्थ्यांवर नामुष्की ओढवली जात आहे. असाच काहींसा अनुभव दि.०१ डिसेंबर रोजी विद्यार्थांना आला असून, बुधवारी सकाळच्या जेवणात गोबीची भाजी बनविण्यात आली होती. त्या भाजीमध्ये अक्षरशः आळ्या आढळून आल्या. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून, यातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी कार्यरत असलेले वस्तीग्रह अधीक्षक दमकोंडेकर हे महिन्यातून एखादे दिवसही वस्तीग्रहात हजेरी लावत असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. 

खरे पाहता अधीक्षक व जेवण बनविणाऱ्या ठेकेदाराने परिपत्रकानुसार दर्जेदार जेवण देणे बंधनकारक आहे. मात्र शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून आर्थिक देवाण - घेवाण केली जात असल्यामुळे या वस्तीग्रहात अतिशय निकृष्ठ दर्जाचे भोजन दिल्या जात असल्याचे विद्यार्थ्यामधून सागितले जात आहे. येथ विद्यार्थी संख्या १२२ असतांना जेवण व राहण्याची सोय व्यवस्थित नसल्याने आजघडीला केवळ ७० ते ८० विद्यार्थी निवासी वास्तव्याला असतात. शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने विहीर किंवा बोअरवरील दुषित पाण्याने तहान भागवावी लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना साथीच्या रोगाची लागण होत असल्याने उर्वरित विद्यार्थी गैरहजर राहत आहेत. असे असताना देखील त्यांच्या नावाची रक्कम दर महिना उचलण्यात येत असल्याचा आरोप उपस्थित विद्यार्थ्यांनी करून अधीक्षकाच्या कारभाराचे पितळे उघडे केले आहे. शासन निर्णयानुसार दर माह प्रतीविद्यार्थी २ हजार ७४० रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. दररोज नियमित जेवणात गहू, तांदूळ, भाजीपाला, इत्यादी वस्तूचा वापर करणे बंधनकारक असून, पोळी भाजी, कंदफळ, पालेभाज्या, वरण, भात, कांदा, दही, लोणचे देणे गरजेचे आहे. सकाळी जेवणात नास्त्यासाठी साबुदाणा, उपमा, शिरा, पोहे यापैकी एक १०० ग्रेम, दुध २०० मिली. १५ ग्रेम साखरेसह, दररोज उकडलेली अंडी व शाखाहारी मुलांसाठी ५० ग्रेम वजनाचा बिस्किटचा पुडा प्रत्येक दिवशी ऋतूनुसार फळे वाटप करण्याचे शासकीय परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. 


तसेच दर आठवड्याला आलटून- पालटून मटण, चिकन प्रती विद्यार्थी २०० ग्रेम रविवारी सोबत कांदा, लिंबू, तसेच शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी दर रविवारी एक वेळ १५० ग्रेम स्वीट (गोड पदार्थ), बासुंदी जिलेबी, बालुशाही, श्रीखंड, गुल जमून, यापैकी एक, नियमित जेवणात द्यावे. आणि आलटून - पालटून सलाड देणे बंधनकारक आहे. असा शासनाचा नियम असताना मात्र येथील मुलांच्या वस्तीग्रहात मात्र यापैकी एकही आट मान्य केल्या जात नाही. आलू किंवा गोबी अश्यापैकी एकाच पदार्थाची भाजी ती सुद्धा केवळ हळद चटणी मीताच मारा देवून विद्यार्थ्यांना खाऊ घातले जात आहे. विद्यार्थ्यांच्या नावे आलेले वरदान व भोजन व्यवस्थापक वाटून खाऊन गलेलट्ठ होत असल्याच्या त्यांच्या कारभारावरून दिसून येत आहेत. येथील वार्डन ( अधीक्षक - दमकोंडेकर ) हे गेल्या ५ वर्षापासून ठाण मांडून बसलेले असून, ते सुधा नांदेड सारख्या शहरात राहून येथे अमावस्या - पौर्णिमेला चंद्राप्रमाणे येवून आपली पगार घट्ट करीत आहेत. अश्या बेजबाबदार कर्मचार्यावर निलंबनाची कार्यवाही करावी. आणि ज्यांच्या नावे भोजन बनविण्याचा परवाना आहे. त्यांचा परवाना तत्काळ रद्द करून शासन परिपत्रकानुसार सकस आहार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी येथील निवासी विद्यार्थ्यांनी केली आहे. 

------------------------ 
मागील काही महिन्यापासून वस्तीग्रहातील साहित्य, बाथरूम, स्वयंपाक घर आणि परिसर घाणीने व्यापला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी अधीक्षकाकडे वारंवार तक्रारी करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नरक यातना भोगत घाणीत वास्तव्य करावे लागत आहे. आठ दिवसापूर्वी वस्तीग्रह परिसरात एक वराह मयत होऊन दुर्गंधी सुटली होती. तरीही सदरील अधीक्षकाने याकडे लक्ष दिले नसल्याने दुर्गंधीचा त्रास सहन करत विद्यार्थ्यांना जेवल करावे लागले आहे. 

घटनेची चौकशी करणार -  डॉ. राजेंद्र भारुड 
-----------------------
याबाबत प्रकल्प अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, सदर घटनेच्या तपासणीसाठी तत्काळ पथक पाठवून चौकशी केली जाईल. तसेच दोषी आढळल्यास भोजन व्यवस्थापक व वस्तीग्रह वार्डन यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.

याबाबत अधीक्षक एस.डी. दमकोंड कर यांच्याशी संपर्क साधून विचारपूस केली असता वस्तीग्रहातील समस्या व आज जेवणात निघालेल्या आल्याबद्दल उत्तर देताना उपस्थित विद्यार्थ्यासमोर त्यांची बोलतीच बंद झाल्याचे दिसून आले.

गुरुवार, 3 दिसंबर 2015

चोरटे सक्रिय

हिमायतनगर शहरात चोरटे सक्रिय... झोपलेल्या महिलेचे मंगळसूत्र पळविले


हिमायतनगर(प्रतिनिधी)गेल्या काही दिवसापासून हिमायतनगर शहरात चोरटे सक्रिय झाले असून, दि.०१ डिसेंबर रोजी चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला. एका ठिकाणी चोरट्या सोबत झटापट एका ठिकाणी काही युवकांनी पाठलाग केला. एवढ्यावरही समाधान झाले नसलेल्या अज्ञात चोरट्याने गाढ झोपेतील दोन महिलेच्या गळ्यातील मनीमंगळसूत्र पळविले आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस झोप काढत असल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, काही दिवसापासून तामिळनाडू, आंध्रप्रदेशात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे रात्रीला थंडी तर दिवसा गरमी होऊ लागली आहे. तसेच रात्र मोठी आणि दिवस लहान झाल्यामुळे १० नंतर सर्वच रस्ते सुनसान होत आहेत. याच संधीचा फायदा घेत काही भुरट्या चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, रात्रीला नागरिक झोपेत असताना चोरी करून पोलिसांना आव्हान देत आहेत. सध्या हिमायतनगर येथील पोलिस निरीक्षकाचे पद रिक्त असल्याचे पोलिस ठाण्याचा कारभार प्रभारीवर चालू लागल्याने चोरटे सक्रिय झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. आसाच काहींसा अनुभव शहरातील बजरंग चौक भागातील अमोल धुमाळे नामक या युवकास आला आहे. दि.०१ च्या रात्रीला मित्रासोबत बाहेर गेलेला युवक रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घरी आला. त्यावेळी घराचे दार उघडे दिसले, सदर युवकाने वडिलास आवाज दिला असता आत घुसलेला अज्ञात चोरटा समोर आला. तू कोण आहेस असे म्हणत पकडण्याचा प्रयत्न केला असता धक्का - बुक्की करून पळ काढला. त्यावरही युवकाने अज्ञात चोरट्याचा पाठलाग केला मात्र तो फरार होण्यात यशस्वी झाला. यानंतर त्या चोरट्याने परमेश्वर गल्ली परिसरातील काही घरात घुसण्याचा प्रयत्न केला तर एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले. त्यानंतर पोलिस स्थानकाच्या पाठीमागील आडे नामक व्यक्तीच्या घरात घुसून चोरीचा प्रयत्न केला, येथील घरमालकांच्या सतर्कतेने चोरट्याचा डाव फसला. तर चौथ्या ठीकाणी आंबेडकर नगर भागातील आनंद संभाजी हनवते यांच्या घरातील सर्वच जन गाढ झोपेत असताना मध्यरात्रीला त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मनी - मंगळसूत्र व लावा कंपनीचा मोबाईल असा अंदाजे ५१०० रुपयाचा माल लंपास केला. याबाबत केवळ एका फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलिस डायरीत अज्ञात चोरट्यावर कलम ४५७, ३८० भादवी अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांशी विचारणा केली असता केवळ एका ठीकाणी चोरी झाली, मात्र ती सुद्धा खरी आहे कि नाही असे सांगून, आकलेचे तारे तोडले आहे. त्यामुळे येथील पोलिस स्थानकाचा कारभार रामभरोसे चालत असल्याचे दिसून येत आहे. तर प्रत्यक्ष ज्यांच्या घरी चोरटे आल्याची माहिती नागरिक निर्भीडपणे सांगून पोलिसात तक्रार देवूनही काही फायदा होत नसल्याचे बोलून दाखवीत आहेत. 

मागील अनेक चोर्यांचा तपास गुलदस्त्यात 
----------------------------------- 
मागील दोन वर्षात हिमायतनगर शहर परिसर, आखाड्यावर व कुलूप असलेल्या घरात मोठ - मोठ्या चोर्या झाल्या. या चोऱ्यांच्या तपासासाठी तत्कालीन पोलिस अधिकार्यांनी, उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक, ठसे तज्ञांना बोलावून विविध भागात तपास केला. मात्र अजूनही याचा काहीच तपास लागला नाही. त्यामुळे चोरीच्या घटनांचा तपास करण्यात पोलिस प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप चोरीमुळे नुकसानीत आलेल्या नागरीकातून केला जात आहे. खरे पाहता पोलिसांकडे चोरटे, पाकीटमार, गुन्हेगार, अवैध्या धंदेवाले, यासह संशयितांची यादीच असते. कोणता गुन्हा कश्या पद्धतीचा यावरून पोलिसांनी तपास करावयाचे असते. परंतु आगावूची झंझट कश्याला म्हणून बहुतांश पोलिस अधिकारी व कर्मचारी कर्तव्यात कसून करीत असल्याने चोरट्याचे फावले जात आहे. तामसा परिसरात एका धान्य गोडावूनच्या चोरट्यांचा अल्पावधीतच तपास लावण्यात आला. तर हिमायतनगर तालुक्यात घडलेल्या चोरीच्या घटनांचा तपास वर्षानुवर्ष होऊन सुद्धा का लागत नाही हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

रुग्णालयाला उपचाराची गरज

हिमायतनगरच्या ग्रामीण रुग्णालयाला उपचाराची गरज... अधिकाऱ्यांच्या कमतरतेने रुग्णांची गैरसोय

हिमायतनगर(प्रतिनिधी)ग्रामीण रुग्णालयात सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा दिसून येत असल्याने रुग्णांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराकडे तालुक्याचे आ.नागेश पाटील आष्टीकर व जिल्हाशल्य चिकित्सकांनी लक्ष देवून गैरसोय दूर करावी अशी मागणी केली जात आहे. 

दैनंदिन बाह्य रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथे किमान चार ते पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांची निकडीची गरज असल्याचे रुग्णांच्या रांगेवरून दिसून येत आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची सर्व मान्य पदे भरलेली आहेत. परंतु काही कारणास्तव वैद्यकीय अधिकार्यांनी इतर ठिकाणी प्रतिनियुक्त्या करून घेतल्या आहेत. सध्या या ठिकाणी रुग्णालयातील ओपीडी, अंतररुग्न, कुटुंब नियोजन, अपघात यासह अन्य कामे हि वैद्यकीय अधीक्षक एस.एम.गायकवाड वसमतकर यांनाच पहावी लागत आहेत. त्यामुळे सर्व भार एकच अधिकार्यावर पडत असल्याने रुग्णांची गैरसोय होत असून, वेळेवर उपचार मिळत नसल्याने गरिबांना खाजगी रुग्णालयाकडे जावे लागत आहे. कार्यरत पैकी श्री हनमंत जाधव या अधिकार्यांनी सोयीनुसार आपली प्रतिनियुक्ती नांदेडच्या स्त्री रुग्णालयात करून घेतली आहे. श्री धुमाळे यांनी स्वताहून कार्यमुक्त करण्याचे पत्र वरिष्ठांना दिले आहे. तर डॉ. डी. डी. गायकवाड हे सुद्धा प्रतिनियुक्तीवर गेले आहेत. येहील रुग्णालयात भोकर येथील जगदीश जाधव हे अधिकारी केवळ दोन दिवसासाठी प्रतिनियुक्तीवर येतात. यामुळे हिमायतनगर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा कागदोपत्री रिक्त नसल्यातरी प्रत्यक्षात मात्र रिक्त असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना नव्हे तर ग्रामीण रुग्णालयास डॉक्टरांच्या उपचाराची गरज असल्याचे नातेवाईकातून बोलले जात आहे. आजघडीला येथील परिस्थिती पाहता तातडीने वैद्यकीय अधिकारी कार्यरत होणे गरजेचे आहे. याकडे जिल्हा शल्य चिकित्सक श्री कंदेवाड यांनी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे व कार्यरत एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे होत असलेले हाल बघून तातडीने येथे अन्य डॉक्टरांची कायम नियुक्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे. 

मंगलवार, 1 दिसंबर 2015

जागतिक एडस दिन

एड्स नियंत्रणासाठी खबरदारी आवश्यक - डॉ. गायकवाड वसमतकर


हिमायतनगर(प्रतिनिधी)सुरक्षित लैंगिक संबंध निर्जंतुकीकरण केलेल्या सुया आणि शुद्ध रक्तपुरवठा या बाबींची खबरदारी घेतली तर एड्सवर नियंत्रण मिळविणे अगदी सोपे असल्याचे मत हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम.एस.गायकवाड वसमतकर यांनी व्यक्त केले. 

ते जागतिक एडस दिनानिमित्त दि.०१ डिसेंबर रोजी ग्रामीण रुग्णालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी विचारपिठावर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष फेरोजखान युसुफखान, पत्रकार कानबा पोपलवार, अनिल मादसवार, असद मौलाना, धम्मपाल मुनेश्वर, शिकाऊ डॉ. पल्लवी पवार, डॉ. पल्लवी तुकाराम पवार, डॉ. नंदा मोरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातील उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थिना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले कि, उपचारापेक्षा खबरदारी बरी म्हणून अनेक दिवस बाहेर राहणाऱ्या किंवा बाहेर काम करणाऱ्या पुरुषांसाठी शासन विनामूल्य कंडोम(निरोध) पुरवठा करत असून, एड्स चे जास्तीत जास्त प्रमाण हे असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होते. म्हणून स्त्री आणि पुसृशनी सुरक्षित लैंगिक संबंधाकडे लक्ष देण्याची गरज आहे. किंवा उपचार घेताना निर्जंतुकिकरण केलेल्या सुया आणि आवश्यक असेल तरच रक्तपुरवठा करून घ्यावा. महिन्याभरात अचानक वजन कमी होणे, शौच्चालाय येत नाही, तोंडात मावा व गाचाकरण येतो अशी लक्षणे वाटू लागल्यास संबंधितानी रक्ताची तपासणी करून घ्यावी. तपासणी केल्यानंतर एड्स बाधित रुग्णांचे नाव गुपित ठेवल्या जाते, त्यामुळे रुग्णांनी कोणतीही भीती न बाळगता उपचार करून घ्यावा. आणि हा धोका टाळून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी आपल्या आचरण व वर्तन चांगले ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले. तसेच अतिजलद सेवेचा वापर करताना रुग्णांच्या नातेवाईकानी खरोखर आपल्याला १०८ व १०४ ची गरज आहे काय..? हे समजून याचा उपयोग घ्यावा आणि वाहन गावात दाखल होण्यापूर्वी वेळ वाचविण्यासाठी आपली तयारी ठेवावी असेही ते म्हणाले. 

हिमायतनगर तालुक्यात गत वर्षभरात १६६७ जणांची तपासण करण्यात आली असून, यात ४ रुग्ण एचआयव्ही बाधित आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असून, १२३० गरोदर मतांची तपासणी झाली असून, यात सर्व रुग्ण नेगेटिव्ह आहेत. एड्सचे रुग्ण कमी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय प्रयत्न करीत असून, सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने जागतिक एड्स दिन साजरा केला जातो अशी माहिती एड्स विभागाचे सी.के.साबळे यांनी दिली. यावेळी आरोग्यमित्र श्री पटेल यांनी उपस्थितांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची माहिती देवून याचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संखेने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर.पी.कल्याणकर, लैब ऐसिस्टन्ट श्री सत्वधर, निल्लेवार डी.एस., डी.एस.सुकरे आदींनी परिश्रम घेतले.

वाचकांना निवेदन

नांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.
नांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या शा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...
anilmadaswar@gmail.com, nandednewslive@gmail.com