जागतिक एडस दिन

एड्स नियंत्रणासाठी खबरदारी आवश्यक - डॉ. गायकवाड वसमतकर


हिमायतनगर(प्रतिनिधी)सुरक्षित लैंगिक संबंध निर्जंतुकीकरण केलेल्या सुया आणि शुद्ध रक्तपुरवठा या बाबींची खबरदारी घेतली तर एड्सवर नियंत्रण मिळविणे अगदी सोपे असल्याचे मत हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम.एस.गायकवाड वसमतकर यांनी व्यक्त केले. 

ते जागतिक एडस दिनानिमित्त दि.०१ डिसेंबर रोजी ग्रामीण रुग्णालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी विचारपिठावर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष फेरोजखान युसुफखान, पत्रकार कानबा पोपलवार, अनिल मादसवार, असद मौलाना, धम्मपाल मुनेश्वर, शिकाऊ डॉ. पल्लवी पवार, डॉ. पल्लवी तुकाराम पवार, डॉ. नंदा मोरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातील उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थिना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले कि, उपचारापेक्षा खबरदारी बरी म्हणून अनेक दिवस बाहेर राहणाऱ्या किंवा बाहेर काम करणाऱ्या पुरुषांसाठी शासन विनामूल्य कंडोम(निरोध) पुरवठा करत असून, एड्स चे जास्तीत जास्त प्रमाण हे असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होते. म्हणून स्त्री आणि पुसृशनी सुरक्षित लैंगिक संबंधाकडे लक्ष देण्याची गरज आहे. किंवा उपचार घेताना निर्जंतुकिकरण केलेल्या सुया आणि आवश्यक असेल तरच रक्तपुरवठा करून घ्यावा. महिन्याभरात अचानक वजन कमी होणे, शौच्चालाय येत नाही, तोंडात मावा व गाचाकरण येतो अशी लक्षणे वाटू लागल्यास संबंधितानी रक्ताची तपासणी करून घ्यावी. तपासणी केल्यानंतर एड्स बाधित रुग्णांचे नाव गुपित ठेवल्या जाते, त्यामुळे रुग्णांनी कोणतीही भीती न बाळगता उपचार करून घ्यावा. आणि हा धोका टाळून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी आपल्या आचरण व वर्तन चांगले ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले. तसेच अतिजलद सेवेचा वापर करताना रुग्णांच्या नातेवाईकानी खरोखर आपल्याला १०८ व १०४ ची गरज आहे काय..? हे समजून याचा उपयोग घ्यावा आणि वाहन गावात दाखल होण्यापूर्वी वेळ वाचविण्यासाठी आपली तयारी ठेवावी असेही ते म्हणाले. 

हिमायतनगर तालुक्यात गत वर्षभरात १६६७ जणांची तपासण करण्यात आली असून, यात ४ रुग्ण एचआयव्ही बाधित आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असून, १२३० गरोदर मतांची तपासणी झाली असून, यात सर्व रुग्ण नेगेटिव्ह आहेत. एड्सचे रुग्ण कमी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय प्रयत्न करीत असून, सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने जागतिक एड्स दिन साजरा केला जातो अशी माहिती एड्स विभागाचे सी.के.साबळे यांनी दिली. यावेळी आरोग्यमित्र श्री पटेल यांनी उपस्थितांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची माहिती देवून याचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संखेने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर.पी.कल्याणकर, लैब ऐसिस्टन्ट श्री सत्वधर, निल्लेवार डी.एस., डी.एस.सुकरे आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी