भारनियमनामुळे दुर्गामंडळ व शेतकरी त्रस्त

वीजकंपनीच्या अघोषित भारनियमनामुळे 
दुर्गामंडळ व शेतकरी त्रस्त


हिमायतनगर(प्रतिनिधी)सर्वत्र सन उत्सवाची धामधूम चालू असताना महावितरण द्वारे केल्या जाणार्या विजेच्या लपंडावामुळे दुर्गामंडळ, शेतकरी नागरिक कमालीचा त्रस्त झाला आहे. एकीकडे वीज बिलासाठी तकादा लावणारी महावितरण कंपनी मात्र सुरळीत वीजपुरवठा देण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे. याचा पार्ट्यात ऐन दसर्याच्या दिवशी सायंकाळी आला असून, यामुळे रस्त्याने जाणार्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे. 

दि.२२ ऐन दसर्याच्या दिवशी सायंकाळी महावितरण कंपनीकडून अघोषित भारनियमन करण्यात आले. याचा नाहक फटका नवरात्रोत्सवात देवीच्या भक्तांना व दसर्यानिमित्त देवी -देवतांचे दर्शन घेण्यासाठी जाणार्या नागरिकांना चांगलाच बसला आहे. एकीकडे शहरात भारनियमन होत नाही असे सांगणारे महावितरण कामाप्नीच्या अधिकार्याकडून मनमानी पद्धतीने वाटेल तेंव्हा वीजपुरवठा खंडित करून दुरुस्तीची कामे केले जात आहेत. लपंडावामुळे संसुडीत आयोजित कार्यक्रमात व्यत्यय निर्माण होत असून, लाईटच्या क्षणाचा भरवसा नाही कधी येईल आणि कधी जाईल त्यासाठी अगोदरच जनरेटरची व्यवस्था लावा असे उद्गार अनेक दुर्गा मंडळाच्या पदाधिकार्यांच्या तोंडून निघत आहेत. हिमायतनगर शहर व ग्रामीण परिसरात ४० हून अधिक ठिकाणी दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करून भक्त मंडळीद्वारे विविध सामाजीक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल सुरु आहे. परंतु उत्सवाच्या या रंगात महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या नाकर्तेपणामुळे भक्तांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच अनेक दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने नुकसानीत येणाऱ्या पिकांना विहीर- बोअरचे पाणी देताना शेतकऱ्यांच्या नाके नऊ येत आहेत. कारण महावितरण कंपनीची अघोषित भारनियमन केले जात असल्यामुळे वीजपंप बंद होऊन शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत. अनेक वेळा महावितरण कंपनीच्या संबंधित कनिष्ठ अभियंता व लाईनमन यांना सूचना देवूनही काहीच उपयोग होत नसल्याने शेतकरी व दुर्गा मंडळाच्या युवकांनी संताप व्यक्त केला आहे. तत्पूर्वी काही मंडळाच्या युवकांनी उत्सव काळात वीज पुरवठा सुरळीत पुरवठा करावा अशी मागणी केली होती. तरी देखील विद्दुत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरु असल्याने महावितरण कंपनीच्या विरोधात शेतकरी व दुर्गा मंडळाचे पदाधिकारी यल्गार पुकारण्याच्या तयारीत आहेत. 

गुरुवारी दसर्याच्या दिवशी रात्री ६ ते ७ आणि पुन्हा पाच मिनिटांनी म्हणजे ७.१५ ते ७.४० या वेळेत वीज पुअरवथ खंडित झाला होता. शहरात विजयादाशामीची मिरवणूक तसेच रावनदहनाच्या कार्यक्रमास शहरातील हजारो महिला- पुरुष बालगोपाल परमेश्वर मंदिर परिसरात जमले होते. परंतु ऐन वेळी अर्धा ते पावून तासाने दोन तीन वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी महावितरण बाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच दुसर्या दिवशी शुक्रवारी सुद्धा सकाळपासून वीजपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाल्याने जवळपास दिवसभर नागरिकांना अघोषित भारनियमनाचा फटका सहन करावा लागला आहे. अचानक आलेल्या कमी - अधिकच्या विद्दुत दाबामुळे काही जणांची विद्दुत उपकरणे देखील खाक होऊन मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा सर्वे करून महावितरण कंपनीने भरपाई द्यावी तसेच वीज बिल वसुली प्रमाणे विजेचा सुरळीत पुरवठा करावा अशी मागणी होत आहे. 

याबाबत उपकार्यकारी अभियंता पंडित राठोड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, १३२ मधून संपूर्ण नांदेड जिल्ह्यात टॉवर लाइन मध्ये झालेली बिघाड दुरुस्तीमुळे काम सुरु आहे. परिणामी नागरिकांना भारनियमनाचा त्रास होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ३ - ४ तासाचे एमर्जेन्सी भारनियमन केले जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी