५१ लाखाचा निधी मंजूर

माजी खा.सुभाष वानखेडे यांच्या प्रयत्नांना यश

नांदेड(खास प्रतिनिधी)हिमायतनगर शहरातील भूमिअभिलेख कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी राज्य शासनच्या प्रशासकीय मान्यतेनुसार ५१ लाख २६ हजारच्या निधी मंजूर झाल्याचे अध्यादेश ५ जानेवारी रोजी जारी करण्यार आले असल्याने हिमायतनगर वासियामधून आभार मानले जात आहे.

मागील सत्तेत असलेल्या काँग्रेस - राष्ट्रवादीच्या काळात हिमायतनगर येथील भूमिअभिलेख कार्यालय स्थापन करण्यात आले होते. तालुक्यातील शेतकरी, नागरिकांची परवड थांबावी व सुसज्ज जागेत इमारत उभी राहून कामास गती मिळावी या उद्देशाने उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयासाठी निधी मिळविण्यासाठी शिवसेनेचे माजी आमदार तथा माजी खा.सुभाष वानखेडे यांनी मागणी केली होती. गात आठ ते दहा वर्षापासून येथे कार्यालय असले तरी इमारत नव्हती हि बाब लक्षात घेता. राज्यात भाजपा- शिवसेनेचे सत्तांतर झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले भूमी अभिलेख कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी ५१ लाख ५६ हजारचा निधी मंजूर करून प्रश्न निकाली काढला आहे.

महसूल व वनविभागाने दि.०५ रोजी हिमायतनगर येथे भूमिअभिलेख कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या इमारतीचे बांधकाम व नकाशा तसेच विस्तृत नकाशास वास्तुविशारदाकडून मंजुरी घेवूनच बांधकाम सुरु करावे असे जरी केलेल्या अध्यादेशात म्हंटले आहे. नवीन इमारतीचे बांधकाम सुरु करण्यापूर्वी जागेच्या मालकी हक्काबाबतची पूर्तता कारवाई लागणार आहे. तसेच बांधकाम करताना पर्यावरण विभागाची मंजुरी घेणे आवश्यक आहे. इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार असल्याने सदर इमारतीचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिल्या गेल्याने हिमायतनगर येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा प्रश्न निकाली निघाल्याने नागरीकातून समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी