पहाणी दौरा क्षणात आटोपला



प्रवाशी व पत्रकारांना वेळ दिला नसल्याने नाराजी

हिमायतनगर(अनिल मादसवार)रेल्वेचे महाव्यवस्थापक पी.के.श्रीवास्तव यांनी दि.०९ रोजी हिमायतनगर स्थानकावर उतरून काही क्षणातच पहाणी दौरा आटोपल्याने सकाळपासून ताटकळत बसलेल्या प्रवाशी, नागरिक व पत्रकारांना समस्या मांडण्यासाठी वेळ दिला नाही.

तेलंगाना आणि महाराष्ट्राच्या सीमारेषेवर असलेल्या हिमायतनगर शहराला प्राचीन इतिहास आहे. दोन राज्याच्या सीमेवर असल्याने येथे प्रवाश्यांचे मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरु असते. हिमायतनगर हि मोठी बाजारपेठ असल्याने येथील व्यापारी मुंबई, हैद्राबाद, नागपूर, अकोला, औरंगाबाद, चेन्नई, सुरत आदी ठिकाणाहून मालाची ने आन करतात. त्यातच हिमायतनगर, बोरगडी व पिंपळगाव हि तीर्थ क्षेत्रे असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही अमाप आहे. परंतु प्रवाशी संस्खेच्या तुलनेत मात्र रेल्वे स्थानकावर सुविधांचा अभाव असल्याने प्रवाश्यांना असंख्य गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

त्याच अनुषंगाने दक्षिण मध्य झोनचे महाव्यवस्थापक पी.के.श्रीवास्तव हे हिमायतनगर स्थानकाची पहाणी दौर्यासाठी आले होते. रेल्वे महाव्यवस्थापकांना समस्यांचे गाऱ्हाणे सांगण्यासाठी सकाळपासून रेल्वे स्थानकावर ताटकळणाऱ्या नागरीक, पत्रकार व प्रवाश्यांना पुरेसा वेळ न दिल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त करीत मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले. रेल्वे स्थानकावरील समस्यांचा पाढा निवेदनाद्वारे रेल्वे संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने मांडण्यात आला. यात प्रामुख्याने तपोवन एक्सप्रेस आदिलाबाद पर्यंत सोडण्याची मागणी लावून धरली. तसेच रेल्वे स्थानकावर पादचारी पूल, पिण्याच्या पाण्याची सोय, महिला - पुरुषांसाठी प्रसाधन ग्रह, कोल्हापूर धनबाद एक्सप्रेसला थांबा, वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टोल उपलब्ध करून प्लाटफोर्मवर जोड प्रवाशी शेड, आसन व्यवस्थेची मागणी करण्यात आली. तसेच पैसेंजर गाड्यांची अस्वच्छता, अपुरी डब्ब्यांची संख्या व एकच तिकीट खिडकी असल्याने नवीन तिकीट खिडकी चालू करून स्वच्छ डब्यांची संख्या वाढविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. रेल्वे संघर्ष समितीने, नागपूर - सोलापूर व्हाया आदिलाबाद, महिला प्रवाश्यांनी आदिलाबाद - पंढरपूर नवीन रेल्वेची मागणी केली. तर जवळगाव स्टेशनवर १७०९,१७०१० या गाडीला होल्ट स्टोप देवून महसूल वाढविण्याची मागणी केल्या गेली. यावेळी माजी जी.प.सदस्य समद खान, गौतमचंद पिंचा यांनी प्रव्श्याना सुविधा करण्यात याव्यात असा आग्रह व्यवस्थापकाकडे धरला होता. याप्रसंगी मुलचंद पिंचा, सौ.लताबाई मुलंगे, मथुराबाई भोयर, प्रकाश कोमावार, गंगाधर मामीडवार, बाबुराव पालवे, नवल पिंचा, सुभाष शिंदे, शे.रहिम पटेल, हमीद खान, जलील मास्टर, पांडू तुप्तेवार, अन्वर खान, उदय देशपांडे, हनुसिंग ठाकूर, राम नरवाडे, विलास वानखेडे यांच्यासह अनेक पत्रकार, नागरिक व प्रवाशी उपस्थित होते.

रेल्वे अधिकारी व गुत्तेदाराची तारांबळ

दरम्यान महाव्यावास्थापाकाच्या पाहणी दौर्याने अधिकारी व गुत्तेदाराची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती. कायम बंद राहणारे प्रतीक्षालय, पिण्याची गैरसोय, नादुरुस्त पंखे, जुनाट आसने, प्रवाश्यांना दिल्या जाणारा सूचना ध्वनिक्षेपक व कायम अस्वच्छ असलेला प्लैटफोर्म आदी सुविधा करण्यासाठी वृद्ध मजुरांना कामाला जुंपून कामे करून घेण्यात आल्याने स्वच्छतेसाठी येथे कायमरूपी दोन कामगाराची नियुक्ती करण्याची मागणी समोर आली आहे.

अब्रू झाकण्याचा अधिकारी - कर्मचार्याचा प्रयत्न

रेल्वे स्थानकाची झालेली दुरवस्था, फुटलेल्या फरश्या, अस्वच्छ परिसर, झाकण्यासाठी प्लॉट फोर्म वरील चाबुतार्याना काळ्या रंगाचा ओईलपेंट लावून रेल्वे अधिकारी आणि गुत्तेदाराने अब्रू झाकण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र उपस्थितांना प्रत्यक्षपणे दिसून आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी