बाटली फोडो आंदोलन

दारूबंदी विरोधात संतप्त महीलांनी पवण्यात केले बाटली फोडो आंदोलन
 

हिमायतनगर(अनिल मादसवार)ग्रामीण भागात अवैद्य रित्या देशी दारूची दुकाने थांटुन गोरगरीबांचे संसार उध्वस्त करणा-यांची दुकानदारी बंद करा अशी मागणी लावून धरत पवना येथील प्राथमिक शाळेसमोर दारबंदीची हाक देत महिलांनी विक्रेत्याच्या घरावर हल्लाबोल करून दारूच्या बोटला फोडून आंदोलन केल्याने अवैद्य विक्रेत्यांनी पाल काढला आहे. हि घटना दि.०३ जानेवारी रोजी तालुक्यातील मौजे पवना या गावात घडली असून, या ठिकाणी दाखल झालेल्या पोलिसाच्या गाडीला सुद्धा महिलांनी घेराव टाकून जाब विचारला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि. तेलंगाना - मराठवाड्याच्या सीमेवर वसलेले पवना येथे खुलेआम देशी दारू अनेक वर्षापासून विक्री केली जाते. हि दारू विक्री बंद करण्यासाठी महिलांनी अनेकदा पोलिस ठाणे गाठले परंतु दारू विक्रेते व पोलिसांचे असलेले अर्थपूर्ण संबंधाने थातूर - माथुर कार्यवाही होऊन अवैद्य दारू विक्रेत्यांना सोडून दिले जात आहे. त्यामुळे दारू विक्रेत्यांचे मनोबल वाढत आहे. मागील काळात येथील पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्या पुढाकाराने व कार्यवाहीच्या धास्तीने हि विक्री बंद झाली होती. त्यांच्या बदलीनंतर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात अवैद्य धंद्यांना पुन्हा सुरुवात झाली असून, काही पोलिस जमादाराच्या लालची वृत्तीने दारूचा महापूर वाहत आहे. याचाच परिणाम पवन येथे पुन्हा खुले आम देशी दारूची विक्री सुरु झाली असून, याची माहिती मिळताच येथील महिलांनी दारूबंदी विरोधात यल्गार पुकारत येथील शाळेसमोर राजरोसपणे विक्री कारेनार्याच्या घरावर महिलांनी हल्ला बोल करून विक्रेत्यास चोप दिला. तसेच त्यांच्या घरातील दारूचे बॉक्स फोडून(चुराडा) करून महिलांचे खरे रूप दाखवून दिले आहे. महिलानाचा रुद्रावतार पाहून दारू विक्रेत्यांनी जागेवरून पलायन केले असून, पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस गावात दाखल होण्या पूर्वीच दारू विक्रेते पाळले होते. त्यामुळे पोलिसांना महिलांच्या रोषाचा सामना करावा लागला असून, गावातील दारूची विक्री बंद झालीच पहीजे.. असे म्हणत पोलिस निरीक्षकांना बोलवा असा पवित्र महिलांनी घेतला. यावरून नव्यानेच पोलिस स्थानकाचा पदभार स्वीकारलेले पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी पवन येथे येवून महिलांशी संवाद साधला. यात महिलांनी येथील दारूची अवैद्य विक्री बंद झाली पाहिजे अशी मागणी केली, त्यांच्या मागणीला उत्तर देत त्यांनी आश्वासन दिले. यावेळी शिल्प राउत, रुक्माबाई गोसलवाड, विमल गायकवाड, सुगंधा घोडगे, देवबाई राऊलवाड, लक्ष्मीबाई पांगिरवाड, शालूबाई अंधारे, चंद्रकला आलेकोडलेवाड, पुष्पा सूर्यवंशी, पुण्यार्थ लिंगमपल्ले, इंदुबाई गायकवाड, लक्ष्मी राउत, शांताबाई सावते, सुजाता राउत, सौमित्र गायकवाड, अनिता वाठोरे आदींसह शेकडो महीलांनि घेतलेल्या आक्रमक भुमीकेमुळे ग्रामीण भागात पुरवठा करणाऱ्या परवानाधारक व विनापरवाना विक्रेत्यामध्ये खळबळ उडाली आहे.

अवैद्य धंदे खपवून घेणार नाही - पो.नि.गिरी 
--------------------
या बाबत पोलिस निरीक्षक अशोक गिरी म्हणाले कि, मी हिमायतनगर पोलिस स्थानकात नव्यानेच रुजू झालो आहे, तालुक्यात सुरु असलेल्या अवैद्य धंद्याची माहिती घेत आहे. माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या परिसरात कोणत्याही प्रकारचे अवैद्य धंदे चालू देणार नाही. जर कुठे सुरु असेल तर नागरिकांनी प्रत्यक्ष माझ्याशी संपर्क करून माहिती द्यावी. तसेच आज पवना गावात महिलांना हा पवित्र घ्यावा लागला असे होणार नाही, येथील दारू विक्री कायमची बंद होईल, तसेच विक्री करणार्याला तातडीने ताब्यात घेवून कार्यवाही केली जाईल असे त्यांनी सांगितले.  

प्रशासनाने पुढाकार घ्यावा - शिल्पा राउत 
----------------
शहरातील काही जन आमच्या गावात दारूचा पुरवठा करतात, त्यामुळे गावात शाळांची संख्या कमी तर दर विक्रीचे अडे जास्त अशी स्थीती निर्माण झाली आहे. हिमायतनगर येथे आठवडी बाजरात जातो म्हणून गेलेले अनेक जन रिकामी थैली घेऊन दारुच्या नशेत घरी येतात. या प्रकारामुळे महीलांचे हसते - खेळते संसार उघडयावर आले असुन, अनेकांच्या डोकयाच कुंकू पुसल्या गेले आहे. दारडया नव-याकडुन महीलांची होणारी कुचंबना थांबविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. 

स्थानिक दुकानदाराकडून होते पुरवठा 
--------------
हिमायतनगर स्थानिक ग्रामपंचायतीच्या हदीतील श्री परमेश्वर मंदिर, पोलीस स्थानक, हनुमान मंदिर, बौध्द समाज मंदिर, कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ परवानाधारक देशी दारुची दुकाने थाटली आहेत. तसेच यातील काही जणांकडून शहर व तालुकयातील ग्रामीण परीसरात चोरट्या मार्गाने दुरूचा साठा पुरवठा करून संबंधित भागातील पोलीसाशी हातीळवणी करुन अवैध्य रित्या देशी दारुची विकी राजरोसपणे सुरु आहे. या प्रकारामुळे अनेक गोरगरीबांचे संसार देशो धडीला लावण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे. हिमायतनगर येथील देशी दारुचे परवानाधारक व विना परवाना विकी करणा-यांनी सकाळी 6 पासुन ते रात्री 12 वाजेपर्यन्त दुकाने सुर ठेवल्याने दिवसभर काबाड कष्ट करन आलेले कामगार, मजुर, गोरगरिब शेतकरी दारुच्या व्यसनी जात आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी