रस्त्याची झाली चाळणी

हिमायतनगर(अनिल मादसवार)नांदेड किनवट राज्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. या खड्डेमय रस्त्याकडे बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहनधारक, प्रवाशी व नागरीकातून केला जात आहे.

हिमायतनगर ते इस्लापूर आणि हिमायतनगर ते भोकर जाणार्या राज्य रस्त्यावरील डांबरी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या जड वाहनामुळे तथा दुरुस्ती करणाऱ्या गुत्तेदाराच्या निकृष्ठ कामामुळे लाखो रुपये खर्चून दुरुस्त करण्यात आलेले रस्ते अल्पावधीतच खड्डेमय झाले आहेत. तर गतवर्षी दुरुस्त करण्यात आलेल्या डांबरी रस्त्यावरील थर डांबराचा कमी प्रमाणात वापर केल्यामुळेच उखडून गेल्याने वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरून ऑटो, जीप, चालवून उदार निर्वाह करणाऱ्या वाहनचालकांना खड्यामुळे पाठीचे व मणक्याचे आजार जडत असल्याचे अनाक वाहनधारकांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना सांगितले.

कामे मंजूर झाल्यानंतर ती गुत्तेदाराला सोपविण्यापासून ते बिले काढण्यापर्यंत अधिकारी - गुत्तेदार यांचे साटेलोटे होत असल्याने स्वार्थापोटी कामाचा दर्जा खालावला आहे. परिणामी अवघ्या वर्षभरात केलेले रस्ते आज घडीला खड्डेमय झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. अश्या खड्डेमय रस्त्यावरून वाहने चालविताना अनेक अपघात झाले असून, यात अनेकांना प्राण गमवावा लागला आहे. अश्या अपघाताची गंभीरतेने दाखल घेवून सुद्धा दर्जेदार पद्धतीने रस्ते दुरुस्तीचे शहाणपण सुचत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभ्यान्ते केवळ टक्केवारी मिळविण्यासाठीचा शासनाने नेमले आहेत कि काय..? असा प्रश्न वाहनधारक विचारीत आहेत. आता तरी बांधकाम विभागाने खड्डेमय झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करून वाहनधारकासह सामान्य प्रवाश्यांना होण्यार्या वेदना दूर कराव्यात अशी रास्त मागणी केली जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी