छावा संघटनेचा उपोषणाचा इशारा

तांदूळ चोरी प्रकरणातील सरसम येथील
मुख्याध्यापक अजूनही मोकाट..

कार्यवाहीसाठी छावा संघटनेचा उपोषणाचा इशारा 

हिमायतनगर(वार्ताहर)मौजे सरसम बु.जी.प.केंद्रीय शाळेच्या मुख्याध्यापकाने केलेल्या पोषण आहार चोरी प्रकरणी अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्यात यावी. या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने २४ पासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आल्याने तांदूळ चोरी प्रकरणाचे पितळे उघडे पडणार आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील मौजे सरसम बु. येथील जी.प.केंद्रीय शाळेत कार्यरत असलेले मुख्याध्यापक श्री देशमुख यांनी १३ ऑगस्ट २०१४ गतवर्षी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान चार पोते तांदूळ, दोन पोते तुरीची दाळ, दोन पोते मटकी, व एक पोते वाटाणा असे ऑटोने घरी घेऊन जाताना गावकर्यांनी रंगेहात पकडले होते. त्यावरून चौकशी अधिकारी पवार यांनी चौकशी केली आणि अकलेचे तारे तोडल्याचे चौकशी अहवालावरून दिसून येते आहे. या प्रकरणी चौकशी अधिकारी पवार यांचा अहवाल सांगतो कि, मुख्याद्यापक देशमुख यांनी शालेय पोषण आहाराचा  माल घरी नेला. हे सत्य असून, तो दुरुस्त करून शाळेत आणणार होतो असे मुख्याद्यापक सांगत असले तरी जागरूक नागरिकांनी विचारणा केली म्हणून बरे झाले. विचारले नसते तर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून हा माल परस्पर लांबविण्याचा इरादा मुख्याद्यापक शिक्षण विस्तार अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांचा असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

तक्रार झाली म्हणून चौकशीचा फार्स करण्याचा हा आटापिटा असल्याचे सदरच्या अहवालावरून समजून येत आहे. चौकशी अहवालात पवार म्हणतात शालेय पोषण आहाराचा माल मुख्याद्यापकाने घरी नेला व तो ग्रामस्थांच्या नजरेत पडल्यामुळे शाळेत परत आणून ठेवला. यावरून तो नजरेत पडला नसता तर काळ्या बाजारात गेला असता हे ते तत्वतः मान्य करतात. यावरून शालेय पोषण आहाराचा माल काळ्या बाजारात नेण्याच्या उद्देशाने तो मुख्याद्यापकाने घरी नेला होता आणि त्यास गटशिक्षण अधिकारी आणी विस्तार अधिकारी पवार यांचे सहकार्य असल्याने त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर कार्यवाही होत नसल्याने गावातील तक्रारकर्त्यांनी वरिष्ठ स्तरावर तक्रार देवून दोषीवर कार्यवाही करावी या मागणीसाठी दि.०८ सप्टेंबर रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष, सदस्य व गावकर्यांनी निवेदनाद्वारे केली होती. 

याची माहिती गटविकास अधिकार्यांनी जिल्हा स्तरावर कळविल्यानंतर तांदूळ चोरी व शाळेतील गैरव्यवहार चौकशीसाठी नांदेड जी.प.चे शिक्षण विस्तार अधिकारी श्री रोटे यांची नियुक्ती दि.१० सप्टेंबर २०१४ रोजी जा.क्रमांक ६४९५ च्या पत्राद्वारे केली होती. परंतु संबंधितानी येथील गैरव्यवहार प्रकारांची चौकशी तर केलीच नाही उलट शाळेच्या मुख्याध्यापकाला अभय देत स्वार्थ साधल्याने अजूनही दोषी मुख्याध्यापका मोकाट फिरत आहे. 

सध्या बदली प्रकरणात अटक झालेले रुस्तुम पवार तथा हिमायतनगर येथील तत्कालीन विस्तार अधिकारी हे जिल्हा अंतर्गत झालेल्या बोगस बदली प्रकरणामुळे वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. त्यांच्याजागी नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी रोटे यांनी कोणती चौकशी केली हे अद्याप गुलदस्त्यात असून, संबंधित मुख्याध्यापकावर कार्यवाही झाली नसल्याने रोटे यांची चौकशी संशयाच्या भोवर्यात सापडली आहे. शालेय पोषण आहार तांदूळ चोरीचे प्रकरण तडजोडीने मिटविण्यात आले कि काय असा सवाल करत, चौकशीसाठी दि.२४ पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.  

याबाबत शिक्षण विस्तार अधिकारी श्री रोटे यांच्याशी भ्रमण ध्वनिवरून संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी