टवाळखोर्यांचा बंदोबस्त करा...

मुलीना छेडण्याच्या घटनेत वाढ... 

हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेची घडी विस्कटू लागली असून, मुलीना छेडण्याच्या घटनेत वाढ होत आहे. या आठवड्यात मुलीना छेडण्याची दुसरी घटना घडल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे. तर पोलिस स्थानकात मुली फिर्याद देत नाही असे सांगून सडकसख्याहरींवर गुन्हा दाखल करण्यात पोलिस कुचराई करीत असल्याने टवाळखोर्याचे मनसुबे वाढत आहेत. 

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, या ठिकाणी तीन खाजगी शाळा महाविद्यालये व दोन शासकीय शाळा व शासकीय औद्योगिक केंद्र आहेत. तसेच येथील बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी महिलांची व शाळकरी मुलींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. सध्या शिक्षणाचे महत्व वाढले असून, महिला साबलीकरनामुळे सर्व क्षेत्रात मुलीसुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नौकर्या व सर्व क्षेत्रात कामे करत आहेत. त्यासाठी हम भी कूच काम नाही असे दाखवून देण्यासाठी ग्रामीण भागातून शाळा - महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या आता वाढत आहे. 

परंतु ग्रामीण भागातील मुली अडाणी असतात असा समाज असलेल्या काही टवाळखोऱ्या करणाऱ्या युवकांना वाटत असून, याचाच फायदा घेण्याच्या उद्देशाने शाळा - कोलेजच्या कॉर्नर, मुख्य रस्ते, अरुंद रस्त्यावरून धूम स्टाईलने वाहने चालविणे, मुली दिसताच टवाळक्या करणे, मोबाईलचे गाणे जोरात वाजविणे, तसेच इशारे हावभाव करून त्रास देण्याचे प्रकार अनाक मुलीसोबत घडत आहेत. परंतु शिक्षणाचे ध्येय समोर असल्याने हा सर्व प्रकार निमुटपणे सहन करून या - जा करीत असल्याने आवारगी करणाऱ्या पोरांची हि छेडखानी आत अधिकच वाढली आहे. असेच प्रकार या आठवड्यात दोन वेळा घडले असून, दोन्ही वेळा तावलाखोरी करून मुलीना त्रास देणाऱ्या त्या युवकांना अन्य युवकांनी चांगलेच बदडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मात्र मुलींची तक्रार होत नसल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करून सोडून दिले जात आहे. परिणामी टग्यांचे मनसुबे वाढत असून, दिवसेंदिवस या प्रमाणात वाढ होत आहे. तरी सुद्धा स्थानिक पोलिस प्रशासन यास अवर घालण्यास अपयशी ठरत आहेत. 

छेडछाडीचा एकही गुन्हा दाखल नाही 
--------------------------------- 
मागील अनेक महिन्यात बर्याचश्या अश्या घटना घडल्या गुन्हा मात्र एकही दाखल झाला नाही, पोलिस मुलीनी फिर्याद दिली नसल्याचे कारण समोर करत असले तरी जायामोक्यावर छेडछाड करणाऱ्या टपोरीला पकडून ठाण्यापर्यंत नेणाऱ्या पोलिसांना मुलींच्या फिर्यादीची गरज काय..? असा सवाल पालक वर्गातून विचारला जात आहे. जय्मोक्यावर कोणताही पोलिस कर्मचारी फिर्याद देवू शकत असल्याने गुन्हा दाखल होण्यास आणि महिला -मुलीना न्याय मिळवून देण्यास मदत झाली असती. मात्र ती पोलिसांची मानसिकता नसून, यात मात्र दडलाय काय..? अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

चीडीमार पथक स्थापण्याची मागणी 
------------------------- 
शहरतील शाळा, महाविद्यालये, मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महिला -मुलींची संख्या पाहता सुरक्षेच्या दृष्टीने येथे चीडीमार पथक स्थापन करून रोड रोमियोच्या विरोधात पोलिसांनी फिर्याद देवून गुन्हे दाखल करावे अशी मागणी जागरूक पालक वर्गातून केली जात आहे. 

अश्याच घटनेमुळे एका मुलीनी केली होती आत्महत्या 
-------------------------------- 
दोन वर्षापूर्वी अश्याच घटनेमुळे त्रस्त झालेल्या तालुक्यातील एका मुलीनी गात दोन वर्षापूर्वी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर संबंधित मुलावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर स्थापन केलेले चीडीमार पथक काही महिनी कार्यरत होते. नंतर पोलिस निरीक्षक बदलतच जैसे थेच कारभार सुरु झाल्याने आम्हाला या टवाळखोर्याच्या त्रासाला बळी पडून नाईलाजास्तव हा मनस्ताप सहन करावा लागत असल्याची खंत एका विद्यार्थिनीने प्रस्तुत प्रतिनिधीसमोर व्यक्त केली. 

मारामारी करणार्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही केली - चव्हाण 
---------------------------------- 
या बाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, आजचा हा प्रकार मुलीच्या छेडखानीचा नव्हता. या मुलांनी सोनारी फाटा येथे काही मुलांना मारहाण केली, त्यामुळे मारहाणीमुळे रागात आलेल्या मुलांनी आपल्या समर्थकासह येतेहे मुलांना मारहाण केली. हा प्रकार शाळेच्या रस्त्यावर व्हायला पाहिजे नव्हता, अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून त्यांना ताब्यात घेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी