कामकाजाची माहिती



हिमायतनगर(अनिल मादसवार)पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस स्थापन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना पोलिसाकडे असलेल्या शस्त्रांची, वायरलेसव पोलिस ठाण्याच्या इतर कामकाजाची माहिती देंण्यात आली.

दि.०२ जानेवारी ते ०८ जानेवारी पर्यंत चालणार्या विविध कार्यक्रमातून पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांच्या सूचनेवरून अनेक विषयांची माहिती देण्यात येणार आहे. या माध्यमातून जनता व पोलिस यांच्यात जवळीकता निर्माण होणार असून, कायदेविषयक माहिती जनतेपर्यंत पोन्चविण्यात येणार आहे. दि.०२ जानेवारी शुक्रवारी शहरातील राजा भगीरथ विद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थीनीना पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी उपलब्ध असलेल्या शस्त्रांची विद्यार्थ्यांना ओळख करून देत सविस्तर माहिती देवून विद्यार्थीनीना स्वसंरक्षणाचे धडे दिले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना खेळ व्यायामाबरोबरच अभ्यासावर लक्ष केंद्रित करून स्पर्धा परीक्षणं सामोरे जाण्याचे आवाहन केले. तसेच साप्ताह दरम्यान तालुक्यातील आश्रम शाळा, ग्रामीण भागातील गावात भेटी तसेच सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी, सराफा व्यापारी, वाहन चालक, पत्रकार यांच्या बैठका घेवून माहितीची देवाण घेवाण करीत सास्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याचे श्री गिरी यांनी सांगितले. यावेळी पोलिस कर्मचारी परशुराम राठोड, कोठेवाड, राठोड, दराडे, जाधव, पाठक, कोठुळे, चव्हाण, यासह पत्रकार कानबा पोपलवार, अनिल मादसवार, अनिल भोरे, धम्मपाल मुनेश्वर आदींसह मुख्याध्यापक अशोक अनगुलवार, कोंडामंगल, कापसे, पवार, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी