शौच्चालयाचे काम प्रगतीपथावर



हिमायतनगर(वार्ताहर)स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत तालुक्यातील अनेक गावात शौच्चालय बांधकामची कामे प्रगतीपथावर असून, लवकरच उर्वरित गावामध्ये शौच्चालयाची बांधकाम सुरु करण्यात येतील अशी माहिती गटविकास अधिकारी श्री विलास गंगावणे यांनी दिली. ते तालुक्यातील कार्ला, टेंभी, चिंचोर्डी, महादापूर येथील गावातील शौच्चालय पाहणी दरम्यान बोलत होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांच्या सूचनेवरून हिमायतनगर तालुक्यात स्वच्छता अभियानाला गती देण्यासाठी पंचायत समितीतील अधिकारी - कर्मचारी सर्वतोपरी मेहनत घेत आहेत. आगामी २०२० साली भारताला महासत्ता बनविण्यासाठी सदर अभियान हे वरिष्ठ पातळीवरून यशस्वी रित्या राबविले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर हिमायतनगर तालुक्यातील करेल, सिरंजनी, टेंभी, अन्देगाव, पवना, सवाना, जीरोना, वाळकेवाडी यासह अनेक गावात शौच्चालाय निर्मित्तीचे कार्य जोमात सुरु आहेत. आजवर १५०० शौच्चालायची कामे पूर्ण प्रगतीपथावर आहेत. लवकरच आणखी एक हजार शौच्चालायचे कामे सुरु होणार आहेत. यासाठी शासन स्तरावरून प्रत्येक लाभार्थ्यांना प्रती १२ हजाराची मदत दिली जात आहे. तसेच नाल्याचे घन सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी शोष खड्डे बनविले जात असून, सर्वांनी या स्वच्छता अभियानात सहभागी होऊन निरोगी आरोग्यासाठी शौच्चालाय उभारावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विस्तार अधिकारी रविराज क्षीरसागर, बाळू दमकोंडवार यांच्यासह संबंधित गावाचे ग्रामसेवक, लाभार्थी नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी