माध्यमांनी वैद्यानिक दृष्टीकोन ठेवावा



हिमायतनगर(वार्ताहर)आधुनिक युगात माध्यमांनी वैचारिक दृष्टीकोन ठेवून वृत्तांकन केल्यास सामाजिक विकास साधण्यास मदत होईल असे मत लॉर्ड बुद्धा वृत्त वाहिनीचे संचालक भैयाजी खैरकर यांनी व्यक्त केले. ते हिमायतनगर येथे आयोजित सत्कार सोहळ्यात बोलत होते.

हिमायतनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासी विद्यालय येथे आगमन झाल्यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भन्ते सारीपुत यांनी उपस्थितांना त्रिशरण, पंचशील वंदना दिली. त्यांनतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने शाल व पुष्पहार व " डॉक्टर बाबासाहेब आंबेकर यांच्या हस्ते भारताचे संविधान राष्ट्राला अर्पण करतानाची प्रतिमा " असलेले स्मृती चिन्ह भेट देवून भव्य गौरव करून, पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, हल्ली इलेक्ट्रोनिक मिडिया पैश्यासाठी नको त्या जाहिराती प्रेक्षानाच्या माथी मारत असून, सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यासाठी त्या जाहिराती कारणीभूत ठरत आहेत. अंधश्रद्धा वाढवणाऱ्या मालिका दाखवून सत्य घटना दडवण्याचा प्रयत्न काही मालिकांमधून होत आहे. यामुळे वैचारिक खच्चीकरण होत आहे, हे थांबविण्यासाठी इलेक्ट्रोनिक मिडीयानी सत्याची कास धरून वास्तव चित्रण दाखविल्यास वैज्ञानिक युगातील घडामोडीचे समाजावर विशिष्ट परिणाम दिसून येतील आणि विकास होण्यास मदत होईल. अनेक जाती पंथात विखुरलेल्या बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी माध्यमांनी सकारात्मक भूमिका घेणे महत्वाचे आहे. अनेक वाहिन्यांवरील मालिकांवर त्यांनी टीका करत या मालिका माती भ्रष्ट करण्याचे काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी विलास गंगावणे हे होते. तत्पूर्वी डॉ.बळीराम भुरके, डॉ. दामोदर राठोड, डॉ.गायकवाड, लॉर्ड बुद्धा वृत्त वाहिनीचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे, गंगाधर वाघमारे, आदर्श शिक्षक नागनाथ अक्कलवाड सर आदींची समायोजित भाषणे झाली. यावेळी मंचावर उत्तमराव राउत, बबन राउत, शाहीर बळीराम हनवते, पुंडलिक कदम, प.स.उपसभापती लक्ष्मीबाई भवरे, विद्यालयाची मुख्याध्यापिका सौ.राउत, सुभाष दारवंडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष पांडुरंग गाडगे, सचिव तथा नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, संघटक कानबा पोपलवार, कार्याध्यक्ष प्रकाश जैन, उपाध्यक्ष दत्ता शिराने, अशोक अनगुलवार, अनिल भोरे, शुद्धोधन हनवते आदींसह अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोखंडे सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार गडपाळे सर यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. मनोज राउत, मारोती वाघमारे, दिलीप ढोले, संजय मुनेश्वर, धम्मा मुनेश्वर आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी