नायगावच्या 6 जणांचा मृत्यू

आंध्रप्रदेशमध्ये झालेल्या अपघातात नायगावच्या 6 जणांचा मृत्यू
नांदेड(प्रतिनिधी)नायगावच्या एका प्रवाशी वाहनाला आंध्रप्रदेशमध्ये अपघात झाला असून त्यात 6 जण मृत्यूमुखी पडले आहे तर दोघे गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत.

प्राप्त माहितीनुसार नांदेडच्या नायगाव तालुक्यातील 30 ते 35 वयोगटातील 8 जण एका चारचाकी वाहनात प्रवासासाठी आंध्रप्रदेशमध्ये गेले होते.महेबूब नगर जिल्ह्यात झालेल्या टवेरा व इनोवा गाडीच्या समोरासमोरच्या धडकेत नायगाव येथील सहा जणांचा मृत्यू झाला तर केरळमधील एकाचा मृत्यू झाला आहे.नांदेडच्या नायगाव येथील दोन जण महेबूब नगरच्या रूग्णालयात उपचार घेत आहेत.

अपघातात मरण पावलेल्या नायगावच्या लोकांची नावे-सुनिल कर्णेकर,व्यंकट भुताळे,राजेश्वर श्रीनिवार,बालाजी पोतदार,शंकर पोतदार व सोबतचा एक अशा 6 जणांचा मृत्यू झाला आहे.गाडीतील दोन जण शिवदास आरळीकर आणि चालक गणेश कुंटूरकर जखमी अवस्थेत आहेत.त्यांच्यावर महेबूब नगरच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघात एवढा भयंकर होता की,दोन गाड्या समोरा समोर धडकल्याने गाडीच्या आतून प्रेते बाहेर लटकलेली दिसत होती.क्रेनच्या सहाय्याने गाड्याना उभे करून प्रेते बाहेर काढण्यात आली.नायगावमध्ये या अपघाताने शोककळा पसरली आहे.

मुख्याध्यापकाला खिचडी शिजविण्याच्या कारणावरून मारहाण

नांदेड(प्रतिनिधी)समराळा ता.धर्माबाद येथे तीन जणांनी खिचडी बनविण्याच्या कारणासाठी मुख्याध्यापकाला मारहाण केल्याचा प्रकार 26 जानेवारीला दुपारी घडला.

समराळा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ गंगाराम इळेगावे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 जानेवारीला दुपारी 2 वा.च्या सुमारास समराळा गावातील दत्ता लक्ष्मण कोपुलवार,सुभाष गणपत इनमुले,साईनाथ दिगंबर भोजमोड हे तिघे आले आणि मुख्याध्यापक नागनाथ इळेगावे यांना म्हणाले,तु आला तेव्हापासून मला खिचडी शिजविण्याचे काम दिले नाही.या कारणासाठी मुख्याध्यापक इळेगावेला मारहाण करण्यात आली.धर्माबाद पोलिसांनी तिघांविरूध्द शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलिस हवालदार आडे करीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी