आज सांगता

भागवत कथेची आज सांगता

नांदेड (प्रतिनिधी)कै. गोपिनाथराव मुंढे व सत्ता स्थापनेच्या स्वप्नपुर्ती निमित्त बालाजी पाटील पुणेगावकर यांनी आयोजित केलेल्या भागवत कथा व किर्तन महोत्सवाचा समारोप 28 जानेवारी बुधवारी होणार आहे.
भागवत कथेला 21 जानेवारीपासून सिडको परिसरातील वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर प्रारंभ झाला. भागवत कथेत काकडा, गाथा भजन, भागवत कथा, हरिपाठ व किर्तन पार पडले. या सोहळ्याची सांगता 28 जानेवारी बुधवारी होणार आहे. बिड येथील ह.भ.प.बाबासाहेब इंगळे यांचे सकाळी 11 वाजता काल्याचे किर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक बालाजी पाटील पुणेगावकर यांनी केले आहे.


श्रीमद भागवत सप्ताह भक्ती ज्ञानयज्ञनाचे आयोजन

नांदेड(प्रतिनिधी)सिडको परिसरातील एनडी 41 दत्तनगर येथे 29 जानेवारी पासून श्रीमत भागवत सप्ताह भक्ती  ज्ञानयज्ञानाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी वृंदावन येथील स्वामी एकनाथ सुदर्शनाचार्यजी महाराज यांचे प्रवचन होणार आहे. हा सप्ताह 4 ङ्गेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. या सप्ताहाअंतर्गत अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान संयोजक संजिवनी चंद्रकांत गुजलवार, सुनील चंद्रकांत गुजलवार, अनिल चंद्रकांत गुजलवार यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी