मजूर ठार

ट्रॅक्टरखाली दबून मजूर ठार; एक जखमी

नांदेड(प्रतिनिधी)रेती भरून घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टरमधील व्यक्ती ट्रॅक्टर व रेतीच्या वजनाने मरण पावला आहे.

26 जानेवारी रोजी दुपारी देगलूर जवळील लेंडी नदी पात्रात शेळगाव ता.देगलूर येथील ट्रॅक्टर चालक संतोष पिराजी गुरफले यांनी निष्काळजीपणे रेती भरलेला ट्रक चालवून एकाचा जीव घेतला.झाले असे की,लेंडीच्या नदी पात्रात वाळू भरत असताना संतोष गुरफलेने आपला ट्रॅक्टर निष्काळजीपणे मागे घेतला.त्यावेळी मागे प्रकाश सिध्दप्पा एकलारे वय 30 रा.नरंगल ता.देगलूर हा मजूर रेती भरत होता.गुरफेच्या ट्रॅक्टरचा धक्का त्याला लागल्याने त्याच्या अंगावर ट्रॅक्टर व रेती पडली.त्या ढिगाऱ्यात दबून प्रकाश एकलारे मरण पावला.तसेच त्या ठिकाणी काम करणारा दुसरा मजूर राजू यलपलवाड याच्या हातास गंभीर दुखापत झाली आहे.

लक्ष्मण इरागोंडा रा.नरंगल यांच्या तक्रारीवरून अपघात प्रकरणी ट्रॅक्टर चालक गुरफले विरूध्द देगलूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक करीत आहेत.

सिडकोत बांधकाम साहित्य चोरले

नांदेड(प्रतिनिधी)सिडकोच्या रामनगर भागात सुरू असलेल्या बांधकामाच्या साहित्याची चोरी अज्ञात चोरट्यांनी चोरल्याचा प्रकार 26 जानेवारी रोजी सकाळी समोर आला.

किशोर श्रीनिवास देशमुख रा.रामनगर सिडको यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.25 जानेवारीच्या रात्री अकरा ते 26 जानेवारीच्या सकाळी 6 वा.दरम्यान त्यांच्या घरचे सुरू असलेले बांधकाम आणि त्यात ठेवलेले वेगवेगळे बांधकामाचे साहित्याचे ज्यात 40 स्टिल कट मशीन,बाईडींग तार,लोखंडी गजाळी असा 41 हजार 900 रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.नांदेड ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस हवालदार कुंभारे करीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी