९१ एड्स बाधित रुग्ण



हिमायतनगर(अनिल मादसवार)सर्वत्र एडस या महाभयंकर आजाराबाबत जनजागृती करून नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात असताना हिमायतनगर तालुक्यात चक्क ९१ एड्स बाधित रुग्नाची संख्या आढळून आल्याने आरोग्य विभागासाठी हि चिंतेची बाब बनली आहे.

हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, ग्रामीण आदिवासी, बहुल भागातील नागरिकांचा मोठास जनसंपर्क आहे. तालुक्यातील हजारो रुग्ण येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मोफत उपचाराचा फायदा घेण्यासाठी येत असतात. ग्रामीण रुग्णालयातील प्रयोग शाळेतील रक्ताची तपासणी करण्यात आल्यानंतर जवळपास ९१ एड्स बाधित रुग्नाची संख्या असल्याचे पुढे आले आहे. यात ४३ पुरुष तर ४८ महिलांचा समावेश आहे. वर्षभरात एकूण १६०० जणांनी रक्ताची तपासणी केली असून, त्यात नोव्हेंबर महिन्यात ३६० जणांची तपासणी झाली आहे. त्यात ०९ जणांच्या रक्ताच्या नमुने एड्स बाधित असल्याचे सांगण्यात आले आहे.

तालुक्यातील मोजक्या जणांच्या तपासणीतून तब्बल ९१ रुग्ण आढळून आले आहे. हि बाब गंभीर असून, तालुक्यातील जनतेने लक्षणे असो किंवा नसोत रक्ताची तपासणी करून घ्यावी. वैद्यकीय अधीक्षक श्री गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्ताची तपासणी बाबत पूर्णतः गुप्तता पाळली जाते असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डी.डी.गायकवाड सामोपादेषक पंडित साबळे, प्रयोग शाळा तज्ञ महेश साळुंके यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना दिली आहे.

जनजागृती नाहीच
----------
हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री गाडेकर यांनी नांदेडला राहूनच येथील कारभार पाहिल्याचे दिसून आले. त्यांनी चार्ज घेल्यापासून एकदाही शहरात एड्स बाधित रुग्णांना जागृत करण्यासाठी प्रभावी जनजागृतीची अंमल बजावणी केली नाही. तर आज एड्स दिवस असताना याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्या गेली नसल्याने तालुक्यात विशेषतः तरुण वर्ग या आजारास बळी पडत आहेत. यामुळे वरिष्ठ अधिकारी एड्स नियंत्रणाबाबत निरुत्साह असल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी