ब्रम्होत्सावाची तयारी

व्यंकटेश बालाजी मंदिरात ब्रम्होत्सावाची तयारी पूर्ण 

हिमायतनगर(अनिल मादसवार)पुरातन कालीन भगवान श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात ब्राम्होत्सावाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, आगामी दहा दिवसाच्या पर्वकाळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव महिलांसह बालगोपालांच्या सहभागाने साजरा होणार असून, याची सुरुवात अश्विन शुद्ध प्रतिपदा दि.२५ गुरुवारी प्रातकाली ४ वाजता अभिषेकानंतर घटस्थापना केली जाणार आहे. अशी माहिती अर्चक कांतागुरु वाळके यांनी नांदेड नेउज लाइव्हशि बोलताना दिली. 

शहरातील पश्चिम बाजूस शेकडो वर्षापूर्वीचे यादव कालीन भगवान व्यंकटेश बालाजीचे मंदिर आहे. नंतरच्या काळात मंदिराची दुरुस्ती झाल्यामुळे सदर मनिर पुरता वाटत नसले तरी मंदिरातील मुर्त्या व बांधकामाच्या दगडावरून ते दिसून येते. बालाजीचे मंदिर हे पूर्वाभिमुख असून, पूर्व - पश्चिम ३३ फुट ४ इंच लांबी, तर दक्षिण - उत्तर रुंदी २७ फुट ६ इंच आहे. मंदिराचे बांधकाम ४ फुट उंचीच्या जोत्यावर करण्यात आलेले असून, मंदिराच्या उभारणीत मोठ मोठ्या दगडांच्या शीला लावलेल्या आहेत. मंदिराचे सभामंडप ७ बाय १४ फुटाचे असून, गर्भग्रह भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी अंतरालासाठी दोन्ही बाजूने एक एक प्रवेश द्वार ठेवण्यात आले आहे. मंदिराचे शिखर अर्धगोलाकार असून, त्यावर लहान शिखर आहे. मंदिराचे प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती कोरण्यात आलेली असून, परंपरेनुसार मंदिराची देखभाल वाळके गुरु करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली दर वर्षी दसरा महोत्सव काळात दहा दिवस विविध कार्यक्रम साजरे केले जातात. 

प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी दि.२५ गुरुवारी आलेल्या अश्विन शुद्ध प्रतिपदेला सकाळी ४ वाजता मंत्रोचार वाणीत अभिषेक महापूजा, आरती केली जाणार आहे. शेकडो वर्षापासून या मंदिरात भगवान व्यंकटेश बालाजी, विष्णू, ब्रम्हदेव, महिषासुर मर्दिनी, स्कंद कार्तिके, श्रीगणेश यासह अन्य देवी - देवतांच्या काळ्या पाषाणातील मोहक मुर्त्या स्थापित आहेत. विजयादशमी रोजी बालाजी मंदिरात येथील मानकरी सुभाष पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते. त्यानंतर संध्याकाळी शहरातून निघालेली विजया दशमीच्या मिरवणुकीतील हजारो भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. या भक्तांना मंदिराचे पुरोहित दासा गुरु व कांता गुरु वाळके यांच्या हस्ते बुदीच्या स्वरूपात तीर्थ - प्रसाद वाटप केला जातो. याच मंदिरात महिषासुर मार्दीनीची मूर्ती असल्यामुळे ब्राम्होत्सव पर्वकाळात बालाजी मंदिर दर्शनाला अनन्य साधारण महत्व प्राप्त होते. 

मुंडण करणाऱ्या भक्तांना जवळून होणार दर्शन 
----------------------------------------------------- 
मागील अनेक वर्षपासून बालाजी मंदिरातील मूर्तीचे जवळून दर्शन घेण्यास भक्तांना मनाई होती. परंतु गतवर्षीपासून सर्व जाती, पंथाच्या भक्तांना बालाजीचे दर्शन जवळून घेत यावे म्हणून मुंडण करून दर्शन घेण्याची संधी अर्चक कांतागुरु यांनी उपलब्ध करून दिली. 

स्फूर्ती महिला मंडळाचा शारदीय नवरात्रोत्सव 
------------------------------------------------ 
विशेष म्हणजे या काळात येथील स्फूर्ती महिला मंडळाच्या वतीने शारदा देवी प्रतिष्ठापना करून नऊ दिवसाचा उत्सव साजरा केला जातो. या काळात महिला मंडळाच्या वतीने फुगडी, लेझीम, लंगडी, गायन, रांगोळी, भजनाच्या स्पर्धा घेतल्या जातात. शेवटच्या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला माता शारदा देवीची मिरवणूक मुख्य रस्त्यावरून काढून विसर्जन केली जाते. तर झालेल्या स्पर्धेतील वेजेत्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करून कार्यक्रमाची सांगता होते. या पर्व काळात विदर्भ, मराठवाडा, आंध्रप्रदेश व कर्नाटकच्या कन्या - कोपर्यातून भक्त जन दर्शनासाठी येतात.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी