लाल्याचा प्रादुर्भाव

कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव.. 
बळीराजाच्या संकटात भर 



हिमायतनगर(अनिल मादसवार)अगोदार पावसाची हुलकावणी.. आणि आता रोगांची लागण.. यामुळे तळ हातावरील फोड प्रमाणे जपलेल्या कापसावर लाल्यारोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बालीराज्याच्या संकटात आणखीनच भर पडली आहे.

जून संपला तरी पुरेसा पाऊस झाला नसल्याने अवेळी पेरणी झाली. त्यातही बहुतांश शेतकर्यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली. ऑगस्ट महिन्यात झालेल्या काही प्रमाणातील पावसाने चिबड जमिनीतील पिके उगवली. त्याची वाढ करण्यासाठी शेतकर्यांना खाते, फवारणी यासह तनकट काढण्यावर भर देत घाम गाळावा लागला. मात्र वाढू लागलेली पिके निस्तेज,कमजोर आणि बहुरोगि झाली. त्यावर मावा, खोकड, कीड रोगाचे आक्रमण झाले. भविष्यात घटणाऱ्या उत्पन्नाच्या चिंतेने नशिबी आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याची सवय झालेला शेतकरी पेरलेल्या कापसास जपू लागला. तरीसुद्धा वातावरणात होणार्या बदलाने कसाबसा वाढवलेल्या कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने पिके करपू लागली आहेत. त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमणात घट होणार असून, लागवडीसाठी लावलले खर्च सुद्धा निघेल कि नाही या धास्तीने आदीच गंगावलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली. 

आता नगदी समजले जाणारे कापसाचे पिक सुद्धा हाताचे जाणार कि काय..? या भीतीने शेतकरी विवंचनेत सापडला आहे. कृषी विभागाच्या वतीने योग्य ते मार्गदर्शन करण्याची गजर निर्माण झाली आहे. मात्र स्थानिकाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कोणतीही ठोस उपाययोजना तथा मार्गदर्शन शेतकर्यांना केले जात नसल्याने वरिष्ठ स्तरावरून केले जाणारे आवाहन  कागदोपत्रीच होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. मोफत औषध उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. तर एकीकडे सरकार निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असताना आपला कैवारी कोण..? अश्या निराष्याजनक भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

आजवरच्या काळात शेतकऱ्यांच्या हाती मुग, उडीद, तीळ आदी पिके येउन सन - उत्सव आनंदाने साजरे केले जात होते. मात्र यावर्षी परिस्थिती अगदी उलट झाली असून, हातात दमडी नसल्याने शेतकर्यांना उधारीवर राशन पाणी आणून सन साजरे करावे लागले आहे. आता मात्र सर्वात मोठा सन दसरा - दिवाळी समीप एवुन ठेपली असताना कापसाच एक बोंड सुद्धा घरी आला नाही त्यामुळे कशी साजरी करावी या विचाराने बळीराजासह मजूरवर्ग आर्थिक कोंडीत सापडला आहे. आता तरी शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेऊन मदतीचा हातभार लावावा अशी रास्त अपेक्षा बोलून दाखवीत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी