अशोकरावांना पाय उतार व्हावे लागले

मेहुणी व सासूवर लक्ष दिल्यामुळे अशोकरावांना पाय उतार व्हावे लागले - गायकवाड यांनी घणाघाती टीका  


हिमायतनगर(अनिल मादसवार)६० वर्षाच्या काळात काँग्रेसने अल्पसंख्यांक, बहुजनाची मते घेतली, मात्र नेहमी या समजला उपेक्षितच ठेवले. एवढेच नाही तर जास्तीत जास्त मुस्लिम तरुणांना जेलमध्ये डांबले आहे. मागील काळात आम्हीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मदत केली, मुख्यमंत्री होताच समाजाचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली. परंतु समस्या सोडविणे दूरच त्यांनी उरावर काठी हाणली आहे. तसेच त्यांनी मेहुणी व सासूवर जास्त लक्ष दिल्यामुळे आदर्श घोटाळ्याच्या कारणावरून पाय उतार व्हावे लागले अशी घणाघाती टीका बहुजन समाजवादी पार्टीचे सुरेशदादा गायकवाड यांनी केला. ते हिमायतनगर येथील शादी खाना हॉलमध्ये आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात आयोजित चर्चा सत्राच्या वेळी मंचावरून बोलत होते. यावेळी अल्पसंख्यांक सेलचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा बी.एस.पी.चे हदगाव - हिमायतनगर विधानसभेचे संभाव्य उमेदवार जाकेर चाऊस, माजी जी.प.सदस्य समद खान, मारोती हुल्काने, उल्लू ख पटेल, मुख्तार जहागीरदार, संतोष गोधजे, सुभाष दरवांडे, गौतम कदम, प्रकाश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

याप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले कि, सत्तधारी काँग्रेस पक्षाने विकासाच्या नावावर महाराष्ट्राचे वाल्वंत केले आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळे सर्वत्र बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, व्यसनाधीनता, गुन्हेगारी, जाती - जमातीतील संघर्ष वाढला आहे. हे सर्व दूर करून एक संघतेचे राज्य आणण्यासाठी    व आघाडी सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आणि दुर्लक्षित मुस्लिम, आदिवासी, बहुजन, दलित व गोर गरिबांना न्याय हक्क मिळून देण्यासाठी आहे. त्यासाठी आम्ही बहुजन समाजवादीच्या तिकिटावर अल्पसंख्यांकांचा नेता म्हणून जाकेर चाऊस यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले जाणार आहे. त्यमुळे हि लढाई एकट्या जाकेर चाऊस यांची नाही तर, तमाम गोर गरिबांची आहे. नौकरीसाठी या नेत्यांच्या शाळेत १५ ते ५० लाख रुपये डोनेशन मोजावे लागतात. चव्हाण यांच्या संस्थेत सरकारची परवानगी न घेत अतिरिक्त क्लासेस चालविले जातात. त्यातही ५ हजाराची रक्कम देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो, त्यामुळे गोर - गरिबांच्या मुलांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. कारखान्याने उभे करण्यात सरकारची तिजोरी रिकामी झाली. त्यानंतर कारखाने बंद झाले, चव्हाण यांनी हुजपा कारखाना खरेदी करताच पुन्हा बंद पडलेली सर्वच कारखाने सुरु झाले. त्यामुळे हदगाव - हिमायतनगर विधानसभेच्या आ. जवळगावकर यांनी  विधानसभेत कारखाना बुडविणाऱ्या बाबत आवाज का उठविला नाही असा सवालही केले.

हिंगोली लोकसभा निवडणुकीत काँग्रेस - शिवसेनेने साटेलोटे केले, परंतु आमदारांचा खा.सातव यांना पराभूर करण्याचा प्रयत्न असफल झाला. अश्या कारनाम्यामुळे आता काँग्रेस सरकारची मरगत त्यांच्या स्वतःच्या स्वार्थी वृत्तीमुळे आली आहे. आम्ही आघाडी व महायुतीच्या विरोधात आहोत, नेहमीच या - ना त्या पक्षाच्या पाटलांच्याच हातात सत्ता आहे. या घराणेशाहीला आळा आणून सर्व सामन्यांच्या हाती सत्ता आणायची आहे. महाराष्ट्रात अल्पसंख्यांक समाजाचा पहिला आमदार  म्हणून जाकेर चाऊस यांना बी.एस.पी.च्या तिकिटावर निवडून आणायचे आहे. यासाठी सर्व बहुजन व अल्पसंख्यांक समाजच आशीर्वाद हवाय. महाराष्ट्राला लुटण्याचे महापाप करणाऱ्या व गरिबांना - गरीब ठेवून स्वतःचा विकास करणार्यांना घरी बसवा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी हजारोच्या संखेत मतदार, नागरिक, समर्थक कार्यकर्ते, पत्रकार  उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी